पुणे– उत्तरेकडील राज्यात पसरलेली तीव्र थंडीची लाट ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी दिला आहे. यामुळे येत्या २४ तासात उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील तीव्र थंडीचा कहर थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी थंडीची लाट नोंदविण्यात आली. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवसात किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार असून ते पुढे कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.