Maharashtra: महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

0
26
त वैद्यकीय पर्यटन,
महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई

महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयात पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची १७३वी बैठक पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महिला-व-बालविकास-योजनां/

बैठकी दरम्यान, टुरिस्ट गाईड प्रोग्राम, वैद्यकीय पर्यटन पुन्हा सुरू करणे, जंगल सफारी येथे कॅरॅव्हॅन सुविधा सुरू करणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर येथे ११ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. तसेच तापोळा, वासोटा, प्रतापगड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिपॅड उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

महाबळेश्वर येथे टुरिस्ट गाईड प्रोग्रामची प्रभावी अंमलबजावणी करावी, गाईडकडून पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच या प्रोग्रामचे प्रमाणीकरण अधिक सक्षम करण्यात यावे, अशा सूचना श्री. देसाई यांनी दिल्या.

महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांवर भर देत वैद्यकीय आणि साहसी पर्यटनाला चालना देण्याचा विभागाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

O

Chat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here