Maharashtra: महाराष्ट्र चेंबरचे कार्य कौतुकास्पद : राज्यपाल रमेश बैस  

1
134
राज्यपाल रमेश बैस
महाराष्ट्र चेंबरचे कार्य कौतुकास्पद : राज्यपाल रमेश बैस शेठ वालचंद हिराचंद स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्राचे आमंत्रण स्वीकारले १५ जून रोजी राजभवनात होणार सोहळा

शेठ वालचंद हिराचंद स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्राचे आमंत्रण स्वीकारले १५ जून रोजी राजभवनात होणार सोहळा 
मुंबई: महाराष्ट्र चेंबरचे कार्य कौतुकास्पद असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावित असल्याचे गौरवोद्वार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाच्या ५० वे सत्राचे निमंत्रण त्यांनी स्विकारले.  १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ०४:०० वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.  https://sindhudurgsamachar.in/maharashtra-केक-कापून-श्रीशनीदेवाच/

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्यपाल रमेश बैस यांचा शाल, श्रीफळ, पुप्षगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.  पुढे ते म्हणाले चेंबर राज्याच्या व्यापार, उद्योगात मोठी महत्वाची भूमिका बजावित आहे. अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र चेंबरचे महत्वाचे स्थान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भेटीप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, गव्हर्निग काऊन्सिल सदस्य उत्तम शहा, नीरव देडीया,  चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.  

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्मृती व्याख्यानाची माहिती त्यांना दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक, भारताच्या उद्योग जगतातील महनीय व्यक्तिमत्व `शेठ वालचंद हिराचंद`  यांच्या स्मरणार्थ दरवर्षी व्याख्यान संपन्न होते. जून महिन्यात ५० वे स्मृति व्याख्यानचा `आत्मनिर्भर भारत` असा व्याख्यानाचा विषय आहे. यापूर्वी झालेल्या व्याख्यानात सरसंघचालक मोहनजी भागवत, तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई, चिफ जस्टीस वाय. व्ही. चंद्रचूड, जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी, तत्कालीन वित्तमंत्री मधु दंडवते, अरुण जेटली, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरुण गोवारीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर या ज्येष्ठ मान्यवरांचे अभिभाषण झाले आहे.

अधिक माहिती देताना अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, राज्याच्या व्यापार आणि उद्योग वाढीसाठी ९५ वर्षापासून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्रातील विविध व्यापार आणि उद्योगांतील ८५० संस्थातील आणि ७ लाख उद्योग आणि ३० लाखांहून अधिक व्यापार संघटनेची शिखर संस्थेचे प्रतिनिधीत्व करत आहे.

००
फोटो ओळी : राज्यपाल रमेश बैस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी सोबत  महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, गव्हर्निग काऊन्सिल सदस्य उत्तम शहा, नीरव देडीया, चेंबरचे सहकार्यवाह सागर नागरे. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here