मुंबई – मुंबई बाहेर हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या कार्यक्रमात काजल हिंदुस्थानी यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणामुळे संतापाची लाट उसळली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), आप आणि शिवसेना (यूबीटी) यासह नागरिक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने रविवारी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांची मीरा रोड येथे काजल हिंदुस्तानीच्या द्वेषयुक्त भाषणातील घटकांची यादी असलेले पत्र घेऊन भेट घेतली. द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवर तसेच ‘जन आक्रोश मोर्चा’च्या आयोजकांवर कारवाई करण्याची विनंतीही या तक्रारीत पोलिस आयुक्तांना करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सादिक बाशा, आपचे सुखदेव बनबंसी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सॅबी फर्नांडिस हे उपस्थित होते. या पत्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींच्याही स्वाक्षऱ्या आहेत.
सकल हिंदू समाज ही हिंदू जनजागृती समिती, शिवप्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना आणि सनातन संस्था यासारख्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन बनवलेली आघाडी आहे. यात सगळीकडून भाजप नेत्यांचा भरपूर सहभाग आणि पाठिंबा आहे. या रॅलीत सहभागी वाक्त्यांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि मुस्लिमांमधील लोकसंख्येच्या स्फोटाच्या सिद्धांतासारख्या विभाजनवादी कथांचा वापर केला. हे मोर्चे सुरुवातीला राज्याच्या ग्रामीण भागात होते. प्रक्षोभक भाषणांना मिळालेले यश आणि कारवाईचा अभाव यामुळे खूश होऊन निमशहरी भागात आणि शहरी भागात मोर्चे निघू लागले. द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक भाषणे, खोटी माहिती आणि अफवा आणि इस्लामोफोबिक आणि जातीय प्रचाराचा वापर करून जातीय तणाव वाढवण्यासाठी रॅलीचा वापर सगळीकडे केला जात आहे. हिंदू ‘लव्ह जिहाद’ च्या षड्यंत्र सिद्धांताचा प्रसार, ज्यात असा दावा करण्यात येत आहे की आला आहे की मुस्लिम लोकांनी हिंदू मुलींना फसवून त्यांना इस्लाम धर्मात प्रेम व दबावाने सामील करण्याचा कट रचला आहे. त्याचप्रमाणे, “लँड जिहाद” म्हणजे मुस्लिमांवर हिंदूंच्या मालकीच्या सार्वजनिक जमीन आणि मालमत्तेवर अतिक्रमण करण्याची मोहीम चालवल्याचा आरोप केला जात आहे. सगळीकडे वक्ते हिंदू आणि मुस्लिमांमधील स्थानिक वादांना त्यांच्या अजेंडाशी जोड देऊन भाषणे करत आहेत.
आजवर झालेली प्रक्षोभक भाषणे पाहता, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी आणि त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी खटला सुरू करण्याऐवजी, पोलीस आणि राज्य अधिकारी डोळेझाक करत आहेत आणि संघटनांना त्यांचे कार्यक्रम/रॅली काढण्यासाठी परवानगी देत आहेत. हिंदू जन आक्रोश मोर्चावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
शिष्ट मंडळाने त्या द्वेषपूर्ण भाषणाचे उतारे मीरा भाईंदर – वसई विरार पोलिस आयुक्त श्री. मधुकर पांडे, आयपीएस, यांना चित्रफितीसह सादर करून चर्चा केली. पोलिस आयुक्त म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले आहे. त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की तक्रारीवर कायदेशीर सल्ला घेतला जाईल आणि पोलिस कायद्यानुसार कार्यवाही करतील. शिष्टमंडळाने एफआयआर नोंदवून द्वेष करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
गुजरातमधील काजल सिंघला यांनी मीरा-भाईंदरमध्ये मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. तिने केवळ मुस्लिम समुदायावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले नाही तर अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि जेव्हा ती बोलली तेव्हा स्वतःला न्याय देण्यासाठी विचित्र षडयंत्र रचले. रविवार, १२ मार्च २०२३ रोजी मीरा रोड येथील एसके स्टोन मैदानावर आयोजित एका सार्वजनिक मेळाव्यात मीरा-भाईंदरच्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाविरुद्ध काजल हिंदुस्थानी यांनी द्वेषयुक्त भाषण केल्याची घटना. या रॅलीला आणि भाषणाला मीरा-भाईंदरच्या निवडून आलेल्या आमदार गीता जैन, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक रवी व्यास आणि मनसे नेते सानिप राणे आणि शिवसेना (ठाकरे) नेते शैलेश पांडे यांनी पाठिंबा दिला. रॅलीच्या सर्व मार्गांवर लावलेल्या मोठ्या बॅनरद्वारे कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात आली.
आपल्या भाषणात काजल हिंदुस्तानी हिने द्वेषयुक्त विधांनांचा वर्षाव करत धमकीपूर्ण व चिथावणीखोर वक्तव्य केले. येथे काही उदाहरणे आहेत. तिने तिच्या भाषणात म्हटले,” पूर्वी….. एक जाळीची टोपी सुद्धा दिसली नाही आणि आता…… जिहादींनी मीरा-भाईंदर काबीज केले आहे. या ‘सुलेमानी किड्यांवर एकच रामबाण उपाय आहे -आर्थिक बहिष्कार”. मीरा-भाईंदरमधील मुस्लिम समाज आणि उत्तन-गोराई येथील ख्रिश्चन समाजाची संख्या वाढत असल्याचा दावा करून त्या म्हणाल्या “इथून चादर वाला (मुस्लिम) मारत आहेत, तिथून फादर वाला (क्रिश्चन) मारत आहेत. काही दिवसांत नया नगरचा नाव बदलून जिहादी नगर होऊन जाईल. नया नगर हे ड्रग्जचे केंद्र आहे, येथूनच ड्रग्जचा पुरवठा होतो. शांतीनगर, जिहाद्यांनी ताब्यात घेतले नाही का? पूनम गार्डन? जो गाड्या लावणारे सगळेचे सगळे जिहादी आहेत. शांती नगर, पूनम गार्डन, जेसल पार्क येथे रस्त्यावरचे फेरीवाले सर्व जिहादी आहेत. त्यांचे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, नवविवाहित जोडप्यांच्या जेवणात त्यांना नपुंसकतेचे औषध ते मिसळतात.
पत्रकारांशी बोलताना सादिक बाशा म्हणाले की, “मीरा-भाईंदरमध्ये द्वेषाचा विजय होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.” सुखदेव बनबासी म्हणाले की, ‘आम्ही आयुक्तांशी बोललो आणि त्यांनी धीराने आमचे म्हणणे ऐकले. आता अशी अपेक्षा आहे की मीरा रोडमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून कारवाई केली जाईल.” सॅबी फर्नांडिस यांनी सीपीला सांगितले की मीरा रोडचा 20 वर्षांचा रहिवासी म्हणून, मी कधीही अशी द्वेषपूर्ण भाषणे करताना पाहिलेली नाही. मीरा-भाईंदर शहरात समाजात दुफळी माजवण्याचा, समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि कायद्याच्या राज्याला खीळ घालण्याचा एकत्रित प्रयत्न केला जात असल्याचे वरील विधानांवरून स्पष्ट होते. द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि अशा कार्यक्रमांना आणि वक्त्यांना आमच्या परिसरातील शांतता भंग करण्याची परवानगी मिळणार नाही याची काळजी घेण्यासाठी शिष्टमंडळ आयुक्तांना भेटल्याचे त्यांना कळवण्यात आले.
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी व सहमति व्यक्त करणाऱ्यांमध्ये फराज खान- गायक संगीतकार, शिवम सिंग- डीवायएफआय, राणा यास्मीन आणि सबूर अन्सार- #हक है, सुहेल बॅनर्जी- चित्रपट निर्माते, मोहम्मद खान, थिएटर अभिनेता/दिग्दर्शक, विनोद चंद, मर्लिन डिसुजा – कॉंग्रेस नगरसेवक, अंकुश मालुसरे- निर्भय भारत, बाबू राव बळीराम शिंदे-मीरा-भाईंदर विकास मंडळ, प्रदीप जंगम- जिद्दी मराठा, संजय पांडे, (ऑल इंडिया लॉंयर्स यूनियन), मुशर्र्फ शमसी, संपादक-पत्रकार, गुलाम फारुकी व मोहम्मद स्वाद -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सलीम अब्बास खान, वंबआ, मुख्तार खान – जनवादी लेखक संघ, अजय पांडे- चित्रपट समीक्षक, बिनोज भास्करन, कुन्ही कृष्णन – एमबीपीएस, सना देशमुख- पहल फाउंडेशन आणि अब्दुल रहमान रिझवी, राष्ट्रीय समन्वयक, अभा कॉंग्रेस पक्ष यांच्या समावेश आहे.