मुंबई: क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचे माजी अध्यक्ष माधव आपटे यांच्या स्मरणार्थ १५ वर्षाखालील मुलींच्या पहिल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ एप्रिल या कालावधीत ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत मुंबईतील नामवंत सहा अकॅडमीचे संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात येणार असून प्रत्येक संघाला किमान दोन साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी लढतील. https://sindhudurgsamachar.in/kokan-नैसर्गिक-उपचार-तज्ज्ञ-अ/
स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांमध्ये यजमान सी.सी.आय. क्रिकेट अकादमीसह दिलीप वेंगसरकर फौंडेशन, अचिव्हर्स क्रिकेट अकादमी, होम ग्राउंड क्रिकेट अकादमी, माधव आपटे इलेव्हन आणि साळगावकर स्पोर्ट्स क्लब अशा सहा संघांचा समावेश आहे. स्पर्धेतील सामने प्रत्येकी २०-२० ओव्हर्सचे खेळविण्यात येणार असून अंतिम फेरीची लढत १७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता खेळविण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहून यापुढे अधीक मोठ्या स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्याचा क्रिकेट क्लुब ऑफ इंडियाचा मानस आहे.