Maharashtra: मा. श्री. अनिलजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

0
142
अनिल विठ्ठलराव पवार.
मा. श्री. अनिलजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नावात काय असं कोणीतरी म्हटलं आहे परंतु नाव बरंच काही सांगून जातं. सरांचं नाव अनिल विठ्ठलराव पवार. आपला वाढदिवस  १८ डिसेंबरचा. आपल्या नावाच पहिलं मराठी अक्षर ‘अ’ आणि इंग्रजीमधील ही पहिलं अक्षर A आहे, वडिलांचे नाव विठ्ठलराव  म्हणजे साक्षात विठ्ठलाचे पुत्र,  आता राहिले आडनाव  पवार म्हणजेच पावर, एक प्रसिद्ध मराठा घराणे, या घराण्याचा मूळ पुरुष शिवकाळात छत्रपति शिवाजी महाराजांच्य सैन्यात एक प्रमुख म्हणून काम केलेले.https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वतःचा-जेसीबी-असलेली-सि/

अनिलजींना आम्हीं साहेब म्हणतो पण आमच्यासाठी ते मित्रच आहेत. मित्र अशा अर्थाने की माझी आणि त्यांची ओळख झाली सन २०१५ मध्ये. जनता सहकारी बँकेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराजा शिवछत्रपति प्रतिष्ठान, शिवसृष्टी प्रकल्पामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हांपासून आम्हांला हे अजब रसायन मिळालं जे आपलं वाटायचं.

अनिलजींचा स्वभाव जितका शांत तितकेच कडक, अचूक मार्गदर्शन, गतीमान प्रशासनाचा ध्यास, कामाचा प्रचंड उरक, न कंटाळता काम करण्याची प्रचंड ऊर्जा, अचूक नियोजन व नियोजना प्रमाणे अंमलबजावणी करण्यावर जास्त भर, दैनंदिन बैठकांमध्ये ऐनवेळी उद्भवलेल्या विषयावर समोरच्या अधिकाऱ्यांचे मन राखून समाधानकारक उत्तरे देण्यात त्यांचा हातखंडा कुणीही धरणार नाही. त्यांची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे कुणालाही न रागवता काम करून घेणे, जो समोर आहे त्यांच्याकडून काम करून घेण्याची त्यांची पद्धत फारच खास.

कामाच्या माध्यमातून वरिष्ठांच्या गळ्यातील आपण ताईत बनले आहात, लोकप्रिय, मनमिळाऊ अशी प्रतिमा आपण योग्यप्रकारे सांभाळली आहे. पदाचा गर्व नाही. आपण सतत कामात व्यस्त असतात तरीसुद्धा सेवकांबरोबरचे छोटेछोटे निरोप समारंभ, वाढदिवस, अशा सहभागाकरता आग्रही असतात. आपले सहकारी यांच्याबद्दल कायम सहकार्याची भावना. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असता, वरिष्ठ अधिकारी, पुढारी, कार्यकर्ते, सोबतचे अधिकारी-सहकारी यांच्या सोबत कायमच सलोख्याचे संबंध. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपण सतत काळजी घेता.

अभ्यासपूर्ण, तात्काळ निर्णय क्षमता, चाणाक्ष, कुठला विषय कधी सोडवायचा याचा पूर्ण अभ्यास आपणास आहे. आपल्या कार्यक्षमतेची नोंद जनता सहकारी बँकमध्येच घेण्यात आलेली आहे, जनता सहकारी बँकेमधून सेवानिवृत्त झालेनंतर आपण बँकेत केलेल्या कामाची दखल घेऊन आपणाला शिवसृष्टी प्रकल्पात प्रशासकीय अधिकारी म्हणून घेण्यात आले. आपण केलेल्या चांगल्या कामाची ही पोचपावतीच आहे. हे काही वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही.

इथे नमूद करायचे म्हटल्यास तो मोठा प्रबंधच होईल. त्याचं सह्कार्यांविषयी तुम्ही व्हा पुढ मी आहे. ही त्यांची खासियत. साहेबांच वयं झालयं असं वाटतचं नाही. कोठून येते ही ऊर्जा देव जाणे. आपल्या मातीशी इमान राखून, सर्वांठायी एकरूप होऊन आपलं वेगेळेपण सिद्ध करणाऱ्या नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने उत्तुंग भरारी घेणाऱ्या पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here