मुंबई – मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा जे. जे. रुग्णालयात तब्बल 130 वर्षे जुने भुयार सापडले आहे. या भुयाराची लांबी तब्बल 200 मीटर असल्याचे समजते. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर अरुण राठोड जात होते. तेव्हा त्यांना एक झाकण दिसले. ते उघडले असता त्यांना आत भुयार असल्याचे दिसून आलेhttps://sindhudurgsamachar.in/maharashtra-पश्चिम-घाट-संवेदनशील-क्/
मुंबईतले सर जे. जे. रुग्णालय म्हणजेच सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय. या रुग्णालयाची इमारत 177 वर्षांपू्र्वी बांधली गेली. त्यासाठी जमशेदजी जिजीभॉ यांनी एक लाखाची देणगी दिली. 15 मे 1845 रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले.
जे. जे. रुग्णालयात सापडलेले हे भुयार डिलिव्हरी वॉर्डपासून ते थेट चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. ऑर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि स्थानिक प्रशासनाला या भुयाराची माहिती कळवण्यात येणार आहे. हे भुयार डी. एम. पेटीट आणि मोटली बाई या इमारतींना जोडलेले आहे .https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लोकसेवा-आयोगाकडून-सरळस/


