मुबंई- सध्या सर्वत्र दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु आहे. प्रत्येजण आपापल्या परीने काहीतरी नवीन खरेदी करत आहेत. मग यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी मागे कसे राहतील. त्यांनी दुबईमध्ये नुकतेच एक घर खरेदी केले आहे. कुवेतचे व्यावसायिक मोहम्मद अलशाया कुटुंबाचा असलेला हा अलिशान व्हिला तब्बल १३ अब्ज रुपयांहून अधिक किमतीला अंबानींनी विकत घेतला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-तरुण-पिढीने-धम्म-जाणून-घ/
आपल्याच महागड्या खरेदीचा विक्रम मोडत अंबानींनी हा नवा विक्रम नोंदवला असून हा व्हिला दुबईच्या समुद्रकिनारी असल्याने त्याला इतकी मोठी किंमत दिली गेल्याचे बोलले जात आहे. ६९८ अब्ज रुपयांहून आधील संपत्तीचे मालक असणाऱ्या मुकेश अंबानींनी अलशाया समूहाकडून हा व्यवहार मागच्याच आठवड्यात पूर्ण केला आहे.अंबानींनी परदेशामध्ये मालमत्ता खरेदीचा सपाटाच लावला असल्याचे बोलले जात आहे. कारण, मागील वर्षी त्यांनी इंग्लंडमध्ये ६ अब्ज रुपयांची संपत्ती खरेदी करण्यासाठी पैसे लावले होते तर सध्या ते न्ययॉर्कमध्येही अशी जागा शोधात आहेत.

