Maharashtra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली मोठी घोषणा,महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती

0
58
मुख्यमंत्री शिंदे
लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रेरणा आणि ऊर्जा देणारे स्मारक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई– राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 40 हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले आहेत.राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज झाली, यात मुख्यमंत्री बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यस्तरीय-आंतरशालेय/

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये 55 हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील 40 हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी राज्य संवर्गाचे एकूण 1983 पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन पद्धती वापरा

डिसेंबर 2020 मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली असून त्याअंतर्गत इमारत बांधकाम परवानगीसाठी ‘बीपीएमएस-ऑनलाईन’ आणि ‘बीपीएमएस टीपी- क्लायंट’ ॲपवर आधारित प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here