मुबंई- राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये रविवारी (16 ऑक्टोबर 2022) ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान होणार आहे. तर सोमवारी मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे.
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 16 ग्रामपंचायतीची मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे.


