Maharashtra: रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार ? हायकोर्टानं राखून ठेवला निर्णय

0
14
रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? हायकोर्टानं राखून ठेवला निर्णय
रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? हायकोर्टानं राखून ठेवला निर्णय

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l 12 डिसेंबर

उत्तर पश्चिम मतदारसंघातील खासदार रवींद्र वायकर यांची खासदारकी जाणार की राहणार याचा फैसला झाला असून मुंबई हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात अमोल किर्तीकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-महिला-रुग्णालय-येथ/

रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. तर त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून अमोल किर्तीकर होते. या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत सुरु होती. एकवेळ अमोल किर्तीकर विजयी झाल्याची बातमी माध्यमांनी लावली. पण अचानक रवींद्र वायकर हे खूपच कमी मतांनी आघाडीवर आल्याचं दिसून आले. अखेर वायकर हे अवघ्या ४८ मतांनी निवडून आल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केले.

परंतु यावेळी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप अमोल किर्तीकर यांनी केला होता. यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत मतमोजणीत घोळ केल्यानं विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांना अपात्र करावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली आणि हायकोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे आता हायकोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here