Maharashtra: राज्यसभेच्या ४१ जागा बिनविरोध,आता १५ जागांसांठी होणार मतदान

0
83
निवडणुक,आचारसंहिता
दोडामार्ग तालुक्याचा स्थानिक उमेदवार विधानसभा निवडणुक रिंगणात

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी ४१ जागांवरील चित्र स्पष्ट झालं असून, या ४१ जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र राज्यसभेच्या १५ जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेची निवडणूक होणाऱ्या या १५ जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील १०, हिमाचल प्रदेशमधील एक आणि कर्नाटकमधील ४ जागांचा समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सावंतवाडीतील-जेष्ठपत्र/

मंगळवारी राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवड जाहीर झालेल्या ४१ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपात नव्याने आलेले अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल. मुरुगन यांचा समावेश आहे. तसेच बिनविरोध निवड झालेल्या ४१ जागांपैकी २० जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ६, तृणमूल काँग्रेसने ४, वायएसआर काँग्रेसने ३, आरजेडीने २, बीजेडीने २ आणि शिवसेना, बीआरएस आणि जेडीयूने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. या जागांवर अन्य उमेदवार नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयी घोषित केले.

५६ पैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उर्वरित १५ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यात उत्तर प्रदेशमधील १० जागांसाठी मतदान होणार आहे. येथील पक्षीय बलाबलानुसार भाजपाचे ७ आणि समाजवादी पक्षाचे ३ उमेदवार विजयी होणार होते. मात्र भाजपाने आठवा उमेदवार दिल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे. आठही उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपाला २९६ मतांची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपाकडे २८६ आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाला आठवी जागा निवडून आणण्यासाठी १० अतिरिक्त मतांची गरज आहे. तर समाजवादी पक्षाला तीन उमेदवार विजयी करण्यासाठी १११ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या दोन आणि बसपाच्या एका आमदाराचं मत निर्णायक ठरणार आहे.

हिमाचल प्रदेशमधील एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. ६८ विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचलमध्ये विजयासाठी ३५ मतांची आवश्यकता आहे. येथे काँग्रेसकडे ४० आमदार आहेत. तर ३ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत ४० आमदार असलेल्या काँग्रेसचा विजय निश्चित आहे.

कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेसने ३ आणि भाजपा-जेडीएस आघाडीने २ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेचे २२४ सदस्य असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे १३५ आमदार आहेत. तर भाजपाचे ६६ आणि जेडीएसचे १९ आमदार आहेत. दोन अपक्ष आणि इतर ४ आमदार आहेत. येथील मतांचं गणित पाहता भाजपाच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तर काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी होऊ शकतात. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्यास येथील निवडणूक रंगतदार होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here