मुंबई – राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या मेगा पोलीस भरती प्रक्रियेला अचानक स्थगिती दिली आहे. कोविड महामारीनंतर बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश होते. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालकांनी प्रसिद्ध केले होते. मात्र १४ हजार ९५६ जागांसाठी होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. ४८ तासात राज्य शासनाने निर्णय फिरविल्याने भरतीची तयारी करणाऱ्या लाखो युवकांत नाराजीची लाट पसरली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जमिनीच्या-एक-दोन-गुंठे-ख/
फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच साधरणत: २७ दिवसांचे नियोजन होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासुन भरतीची तयारी करणाऱ्या युवा वर्गात मोठ्या मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. ऐन दिवाळीत राज्य शासनाने मेगा भरती जाहीर करुन युवा वर्गाची दिवाळी गोड केली होती. मात्र,आजच्या निर्णयाने भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. https://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/
२७ ऑक्टोंबर रोजी पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी १४ हजार १५६ पदे भरण्याबाबत परिपत्रक जाहिर केले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासात या भरतीला प्रशासकीय स्थगिती देण्यात येत आहे. जहिरात देण्याबाबतचा निर्णय यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनीच २९ ऑक्टोबरच्या परिपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. १२ लाखांपेक्षा जास्त मुले या भरतीची तयारी करीत आहेत. https://sindhudurgsamachar.in/vengurla-वांद्रेश्वर-व-धोकमेश्व/


