नागपूर दि. २० डिसेंबर – ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत ईडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय…अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.