पुणे, ता. १५ : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेअंतर्गत पीसीबी गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिल, तर पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल दरम्यान होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
याशिवाय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी शिक्षण यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘सीईटी सेल’मार्फत एकूण १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, ज्यांचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच प्रकाशित करण्यात आले होते.
अन्य महत्त्वाच्या परीक्षांचा कालावधी
■ परीक्षा कालावधी
* एलएलबी (तीन वर्षे) ३ आणि ४ मे
* एमसीए २३ मार्च * एम.एचएमसीटी २७ मार्च * बी. एचएमसीटी / एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड २८ मार्च * बी. डिझाइन २९ मार्च * एमबीए/एमएमएस १ ते ३ एप्रिल * एमएच- नर्सिंग ७ आणि ८ एप्रिल * एलएलबी (पाच वर्षे) २८ एप्रिल
*बी. बीबीए/बीसीए/बीबीएम / बीएमएस/एमबीए इंटिग्रेटेड / एमसीए इंटिग्रेटेड
२९, ३० एप्रिल, २ मे