Maharashtra: राज्यात थंडी पुन्हा परतली; पुढील १० दिवस गारठा

0
15
cold, thandi
राज्यात थंडी पुन्हा परतली; पुढील १० दिवस गारठा

🔥⏩दैनिक सिंधुदुर्ग समाचार

सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-महागाईचा-आगडों/

गेल्या काही दिवसांमध्ये ‘फेंजल’ चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी चांगलीच वाढवली होती. पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली. पण आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंझावात) वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वा-यांचे झोतमुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून खान्देश, नाशिक पासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण राज्यात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार (दि. १०) नंतर थंडी जाणवेल.

विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार (दि. १०) नंतर तेथेही वातावरण निवळेल, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here