Maharashtra: राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत विलेपार्ले तील मल्लखांब खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी

0
34
३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोलाची कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत विलेपार्ले तील मल्लखांब खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l विलेपार्ले –

विलेपार्ले मधील दोन मल्लखांब खेळाडू जान्हवी जाधव व रिषभ घुबडे या दोघांनी उत्तराखंड येथे नुकत्याच झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोलाची कामगिरी केली आहे.प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आणि मल्लखांब संघ अंधेरीचे अध्यक्ष माननीय अरविंद प्रभू सरांनी या दोन्ही विजेत्या मल्लखांब खेळाडूंची भेट घेतली व त्यांचे कौतुक केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-हिंदू-धर्म-रक्षक-दानशूर-

या प्रसंगी श्री.सुनील वालावरकर सर सुद्धा उपस्थित होते. वर्ल्ड चॅम्पियन जान्हवी जाधव हिने दोरी मल्लखांब साधन प्रकारात सुवर्ण पदक,सांघिक रौप्य पदक व पुरलेला मल्लखांब साधन प्रकारात कांस्य पदक पटकाविले तर रिषभ घुबडे ह्याने सुद्धा दोरी मल्लखांब साधन प्रकारात सुवर्ण पदक,सांघिक रौप्य पदक व वैयक्तिक विजेतेपद स्पर्धेत कांस्य पदक अशी प्रत्येकी तब्बल तीन पदके जिंकली. अशा कठीण स्पर्धेत पदके मिळवणे खूपच कौतुकास्पद आहे.

या दोघांचे प्रशिक्षक मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री.गणेश देवरुखकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे तसेच आंतरराष्ट्रीय पंच इशा देवरुखकर व वरीष्ठ प्रशिक्षक श्री.महेश अटाळे सर यांचे मार्गदर्शन सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.अरविंद सरांनी या विजेत्या खेळाडूंना आशीर्वाद तर दिलाच पण पुढील येणार्‍या स्पर्धेसाठी खूप छान मार्गदर्शन दिले,तसेच या पुढेही संकुलाच्या सुखसुविधा देण्याचे निश्चित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here