Maharashtra: राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची ६ पदकांची कमाई

0
129
राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची ६ पदकांची कमाई
राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची ६ पदकांची कमाई

चेन्नई : नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या ३९व्या सबजुनिअर आणि ४९ व्या जुनिअर राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलातील खेळाडूंनी एकूण सहा पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-आचरा-उपविभाग-प्र/

यात मुलांच्या १५ वर्षाखालील वयोगटात स्वराज लाड याला १मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात २४२.९५ गुण प्राप्त करून रौप्य पदक आणि 3मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये २७५.८० गुण प्राप्त करून कांस्यपदक तसेच नेहा पास्टे हिला मुलींच्या १५ वर्षाखालील गटात १मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये १७३.०० गुण मिळवून रौप्यपदक पटकावले . मुलींच्या १८ वर्षाखालील वयोगटात केया प्रभू हीला १मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग तसेच हायबोर्ड डायव्हिंग या दोन्ही प्रकारात कांस्यपदक मिळाले. तसेच कबीर राव याला १मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये ३३६.१५ गुण प्राप्त करत रौप्य पदक मिळाले आहे.

या सगळ्या यशात प्रशिक्षक सायली महाडीक व तुषार गितये यांचे मार्गदर्शन लाभले. संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू व सचिव डॉ.मोहन राणे त्यांच्या खंबीर पाठिंबामुळे व सततच्या प्रोत्साहनामुळे संकुलाच्या खेळाडूंनी हे यश संपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here