Maharashtra: लोकमान्य टिळक टर्मिनस जवळील कामामुळे मध्य रेल्वेकडून तात्पुरता बदल

0
23
लोकमान्य टिळक टर्मिनस जवळील कामामुळे मध्य रेल्वेकडून तात्पुरता बदल

रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन जवळ रेल्वे मार्गावरील अग्रेडेशनच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या मत्स्यगंधा तसेच नेत्रावती एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंतच करता येणार आहे.

तिरुअनंतपुरम ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) तसेच मंगरूळ सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस (12620) या दिनांक ८ नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रवास सुरू होणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास मुंबईत येताना पनवेल स्थानकाचा संपणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-करोनाकाळात-वाढलेली-३५-ट/

याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल (12619) मत्स्यगंधा एक्सप्रेस दिनांक 11 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत पनवेल स्थानकातून सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम सेंट्रल (16345) नेत्रावती एक्सप्रेस ही गाडी देखील दिनांक 10 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकातून सुटणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस जवळील पिट लाईनच्या कामामुळे मध्य रेल्वे कडून या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या तसेच प्रवास संपण्याच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here