Maharashtra: लोकशाहीर कृष्णा कुंभार अनंतात विलीन…!

0
27

मुंबई- (प्र.ह.धनावडे)  मूळ गादी बाबू रंगेला घराण्यातील शिघ्रकवी शाहीर वासुवाणी या शाहिरी सांप्रदायातील रायगड जिल्ह्यातल्या पोलादपुर तालुक्यातील मु. कापडे बुद्रुक येतील सुप्रसिध्द लोकशाहीर कृष्णा कुंभार यांचे अल्पक्षा आजाराने निधन झाल्याने कोकणातील शाहिरी क्षेत्रात खुप मोठी हानी झाली आहे.शक्ती-तुरा (जाखडी) शाहिरी, भेदिक शाहिरी कवने, साकी, अभंग, प्रवचन तथा किर्तन यावर त्यांची प्रकांड वक्तृत्वता होती. कोणत्याही विषयावर ते आपल्या पहाडी आवाजात शास्त्र-शुध्द व्याख्यान द्यायचे. ही… ही….कांचन लंका गेली….या सारखी त्यांची अनेक लोकगीते सुप्रसिध्द होती.त्यांचे गुरूबंधु लोकशाहीर मधुकरबाबा पंदेरे यांनी कुंभार माऊलींची शाहिरी कलेतील महती, त्यांचे आद्य गुरू वासुवाणी यांच्या काव्यसाकी या गितातून वाहुन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. https://sindhudurgsamachar.in/manoranjan-ऐ-जिंदगीचा-ट्रेलर-रिली/

        उदेला जणू हा दिन कांचनाचा  !

       निवाला झणी तो ताप या लोचनाचा  !!

       मला लागू दे ध्यास त्रैलोचनाचा  !

       म्हणे वासुदेव सावध नाच नाचा   !!

या काव्यसाकीच्या साहाय्याने  कुंभार माऊलींचे शाहीरी कालाक्षेत्रातील जीवन चरित्र्य अंतर भावनेतून व्यक्त केले. अशा या लोकशाहीर कृष्णा कुंभार बुवांना अखंड वासुवाणी घराणे शाहिरी शिष्य संप्रदायातर्फे ही शाहिरी श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच आई तुळजा भवानी त्यांच्या कुटुंबियाना या दु:खातून सावरण्यास बळ देवो अशी प्रार्थनाही करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here