लोणावळा :-:-लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहेत. चार लहान मुलांसह एक महिला पाण्यात वाहून गेली आहे.त्यातील तिघा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर दोघांचा शोध सुरू आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आंबोली-मार्गे-होणारी-अवज/
शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय वर्ष 36), अमीमा आदिल अन्सारी (वय 13), अदनान सभाहत अन्सारी (वय 04), मारिया अकिल सय्यद (वय 09), उमेरा आदिल अन्सारी (वय 08) असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा, अमिमा आणि उमेरा या दोन मुलींचा मृतदेह सापडले आहेत. तर दोन मुलींचा शोध उशीरापर्यंत सुरू होता. पोलिस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडलेल्या दोघांचा शोध घेत होते.
पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाच जण प्रवाहात उतरले. मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं. मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले.
जोरदार पावसाने धबधब्याचे पाणी वाढले
*लोणावळा परिसरात रविवार सकाळपासून पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तर सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झालेले आहेत. पाणी धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहेत.
लोणावळा भुशी Dam येथे दिनांक. ३०/६/२०२४ रोजी दुपारी १ वाजता ही दुदैवी घटना घडलेली आहे. पूर्ण कुटूंब वाहून गेले आहे. पर्यटकांनी सतर्क रहावे.