Maharashtra: वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना काढणार निषेध मोर्चा

0
23
वारकरी लाठीहल्ला ,कणकवली,
वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना काढणार निषेध मोर्चा

शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी -पांडूशेठ साठम

कणकवली- आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर शिंदे -फडणवीस सरकारच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. वारकऱ्यांवर हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवरच हल्ला करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसील कार्यालयावर आज सायंकाळी ४ वाजता निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे. तरी शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कृषी-यांत्रिकीकरण-योजने/

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here