Maharashtra: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात किती मतदार? पुरुष, महिला, तरूण आणि प्रथम मतदारांची संख्या आली समोर

0
16
मतदान,विधानसभा निवडणुक,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदार संघात बुधवारी सुमारे ७२ टक्क्यापर्यंत मतदान

-🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारमुंबई l 16 ऑक्टोबर

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होतील. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल, तर नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, तर बहुमतासाठी 145 जागा आवश्यक आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एअर-इंडिया-एक्सप्रेसच्/

महाराष्ट्रातील मतदारांची संख्या
राज्यातील एकूण मतदारांची संख्या सुमारे 9.63 कोटी असून त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर महिला मतदारांची संख्या 4.66 कोटी आहे. तरुण मतदारांची संख्या 1.85 कोटी आहे. तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 20.93 लाख आहे. महाराष्ट्रात एकूण 52 हजार 789 ठिकाणी 1 लाख 186 मतदान केंद्रे असतील. त्यापैकी 42 हजार 604 शहरी भागात तर 57 हजार 582 ग्रामीण भागात आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी 960 मतदार मतदान करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here