Maharashtra: विशाळगड मुक्ती संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी छ्त्रपती संभाजीराजेंनी बोलवली महत्त्वपूर्ण बैठक

0
112
Vishalgad,
शिवभक्तांच्या आग्रहाखातर १३ ऐवजी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती मोहीम : छत्रपती संभाजीराजे यांची माहिती

* राज्यभरातून दुर्गप्रेमी संस्था व शिवभक्त राहणार उपस्थित

बुधवार, ०३ जुलै २०२४विशाळगड मुक्ती संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी छ्त्रपती संभाजीराजेंनी बोलवली महत्त्वपूर्ण बैठक : राज्यभरातून दुर्गप्रेमी संस्था व शिवभक्त राहणार उपस्थित
 
कोल्हापूर : विशाळगड किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शिवभक्तांमधून रोष वाढताना दिसत आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी या विषयात पुढाकार घेऊन विशाळगडास अतिक्रमणे व धर्मांधतेच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी अनेक शिवभक्तांनी पत्रव्यवहार, सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील दीड वर्षांपूर्वी विशाळगडास प्रत्यक्ष पाहणीपर भेट देऊन गडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली होती.
या बैठकीत गडावर पशूपक्षी हत्या बंदी लागू करण्याचे निश्चित झाले होते. तसेच तीन महिन्यात गडावरील अतिक्रमणे हटविली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र स्थानिक राजकारण्यांनी आणलेला अडथळा व जिल्हा प्रशासनाची अकार्यक्षमता यांमुळे ही कामे अर्ध्यातच बंद पडली व गडावर पुन्हा एकदा अतिक्रमणे व धर्मांधता जोर धरू लागले आहेत, असे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दहा-दिवसाच्या-लेखी-आश्वा/

त्यामुळे विशाळगड मुक्ती संदर्भात छ्त्रपती संभाजीराजे यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे दिसत असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी संभाजीराजे यांनी कोल्हापूर येथे जाहीर बैठकीचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ०७ जुलै रोजी सकाळी १०:३० वा. कोल्हापूरातील शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या या या बैठकीस राज्यभरातून शिवभक्त व दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here