विश्व मराठी परिषदेतर्फे २१ फेब्रुवारी ते ११ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त अशा ५६ ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी क्षमता आणि कौशल्ये विकसित करणाऱ्या या ५६ कार्यशाळांमध्ये अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रँड निर्माण करण्यासाठी विश्व मराठी परिषदे कटिबद्ध आहे. प्रत्येक कार्यशाळेचा कालावधी चार दिवस असून रात्री ८ ते ९ अशी कार्यशाळेची वेळ असेल. कार्यशाळांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातील १० कार्यशाळा निःशुल्क असून इतर कार्यशाळांसाठी प्रत्येक कार्यशाळेसाठी रू. ७५०/- इतके आणि विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांसाठी वीस टक्के सवलत म्हणजे रू. ६००/- इतके माफक शुल्क ठेवण्यात आले आहे.
कार्यशाळांचे विषय कथालेखन, कादंबरी, ब्लॉग,फेसबुक लेखन, अनुवाद, निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत, कविता, सेल्फ पब्लिकेशन, ललितेतर लेखन, यशस्वी उद्योजकता, ऑनलाईन पत्रकारिता, पॉडकास्ट, यु ट्यूब चॅनेल, करियर प्लॅनिंग, मुलाखत तंत्र, आर्थिक आणि निवृत्ती नियोजन, पटकथा / वेब सीरिज लेखन, माहिती अधिकार कायदा – सजग नागरिक, भांडवल उभारणी – क्राउड फंडिंग, म्युझिक थेरपी, गर्भ संस्कार, व्यवसाय कसा सुरु करावा ?, टुरिझम आणि ॲग्रो टुरिझम व्यवसाय, स्वरसंस्कार आणि संवर्धन, डॉक्युमेंटरी / शॉर्टफिल्म, थिंक पॉझिटिव्ह-सकारात्मक जीवनशैली, समाजकार्य- एन.जी.ओ स्थापना, दुर्ग भ्रमण-गिर्यारोहण-साहसी खेळ, इ. असून *व्यक्तित्व आणि चारित्र्य निर्माण, जीवनाचे व्यवस्थापन, कुटुंब व्यवस्था पद्धती, विवाह संस्कार आणि उद्योजक – व्यावसायिक बना* या कार्यशाळा निःशुल्क आहेत.
कार्यशाळा करून यशस्वी होता येत नाही. मात्र ज्यांना जीवनात यशस्वी व्हायचे आहे त्यांना कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. कारण कार्यशाळांमध्ये अनुभवी व्यक्तींचे अनमोल मार्गदर्शन मिळते. विश्व मराठी परिषदेच्या या उपक्रमामध्ये डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, उस्ताद उस्मान खां, विवेक वेलणकर, राजेंद्र खेर, चारुदत्त आफळे, अनिल कुलकर्णी, लीना सोहनी, अभय भंडारी, प्रा. क्षितिज पाटुकले, उमेश झिरपे, अतुल कहाते, नीलिमा बोरवणकर, शैलेंद्र बोरकर, प्रभाकर भोसले, विघ्नेश जोशी, अजित आपटे, ओंकार दाभाडकर, भालचंद्र कुलकर्णी, श्रीनिवास भणगे, डॉ.अंजली दाणी, डॉ. स्मिता कुलकर्णी, रवींद्र खरे, महेश शेंद्रे, तुषार जाधव, इ. दिग्गज नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शक, मार्गदर्शन करणार आहेत.
विश्व मराठी परिषदेने आतापर्यंत विविध विषयांवर ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या असून त्यामध्ये देश विदेशातील १२,००० हून अधिक मराठी भाषिक बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला आहे. यातील सहभागी विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल सुरू केली असून अनेकांची पुस्तके प्रकाशित झाली, अनेकांनी ब्लॉग सुरु केले, उद्योग व्यवसाय सुरू केले. आपल्यामधील क्षमतांचा, कौशल्यांचा विकास होण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या जीवनात भरीव कामगिरी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या कार्यशाळा आहेत. विश्व मराठी परिषद लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
खाली दिलेल्या लिंकवर कार्यशाळांबद्दल सविस्तर माहिती आणि सर्व कार्यशाळांचे वेळापत्रक उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होता येईल. कार्यशाळा ऑनलाईन असल्याने महाराष्ट्रातील, भारतातील विविध राज्यातील आणि भारताबाहेरील विविध देशांतील मराठी भाषिकांनी यामध्ये सहभागी व्हावे. तसेच फक्त एकदाच रू. ८००/- भरून विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद व्हावे असे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक प्रा. अनिकेत पाटील यांनी केले आहे.
https://www.vishwamarathiparishad.org/karyshala
*कार्यशाळांची माहिती व्हॉटसअपद्वारे मागवण्यासाठी 7066251262 यावर “कार्यशाळा” असा व्हॉटसअप संदेश पाठवा.*
अधिक माहितीसाठी संपर्क : विश्व मराठी परिषद, पुणे – 9673998600 आणि 9309462627