वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकास्तरीय ग्रामीण व शहर कार्यकारिणीची सभा सोमवार दि. २९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉस्पिटल नाका येथील पक्ष कार्यालयात होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-श्री-बाजीराव-आण्णा-विष्/
या बैठकीत बुथ निहाय आढावा, विविध सेलच्या तालुका कार्यकारिणी निवड व १० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तरी वेंगुर्ला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष योगेश कुबल व शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.