मुबंई- प्रत्येक राज्यामध्ये १० लाख लोकसंख्येमागे १०० एमबीबीएस डॉक्टर हे गुणोत्तर राखण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे २०२५-२६ पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-बाजारपेठ-मित्/
देशातील विद्यार्थांना दर्जेदार आणि परवडणारे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करणे, देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी सर्व भागांमध्ये उच्च दर्जाचे डाॅक्टर उपलब्ध करणे, नागरिकांना त्यांच्या घराजवळ उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करणे, वैद्यकीय संस्थांचे पारदर्शक पद्धतीने मूल्यमापन करणे, डॉक्टरांची नोंदणी ठेवणे अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत वैद्यकीय शिक्षणाचे मूल्यमापन करणाऱ्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील १० लाख लोकसंख्येमागे १०० डॉक्टरांचे गुणोत्तर राखण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.