Maharashtra: शाळेत शिक्षकांना जीन्स, टी-शर्ट घालण्यास मनाई

0
65
शिक्षक,
शाळेत शिक्षकांना जीन्स, टी-शर्ट घालण्यास मनाई

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा, तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन असा पेहराव करावा. शिक्षकांनी जीन्स आणि टी- शर्टचा वापर करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तसेच शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ‘ड्रेस कोड’ ठरवावा, असे राज्य सरकारने सांगितले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-निपुणोत्सव-स्पर्धेत-चंद/

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्याक अशा सर्व व्यवस्थापनांतर्गत अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. नागरिक त्यांच्याकडे ‘गुरू’, ‘मार्गदर्शक’ म्हणून पाहतात. या शिक्षकांचा विद्यार्थी, पालक, नामांकित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क येत असतो. अशा वेळी शिक्षकांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधितांच्या वेशभूषेवरून त्याची छाप पडते. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहावे लागते. वेशभूषा ही आपल्या शाळेस, पदास किमान अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे.

राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत ‘Tr.’ तर मराठी भाषेत ‘टी’ असे संबोधन लावण्याची सूचना राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे दिली आहे. तसेच या संदर्भातील शिक्षण आयुक्तांमार्फत बोधचिन्ह निश्चित करण्यात येणार आहे.बोधचिन्ह लावण्याची सूचना राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे दिली आहे. तसेच या संदर्भातील शिक्षण आयुक्तांमार्फत बोधचिन्ह निश्चित करण्यात येणार आहे. हे संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनांवर लावता येणार आहे. राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ‘ड्रेस कोड’ अंतर्गत अद्यतनित काम केले जाणार आहे. तसेच शिक्षकांना नीटनेटक्या पेहरावात शाळेत यावे लागणार आहे. या विषयावरील जागरूकता व त्याची पालनपूर्वक केलेली असल्याची सूचना शाळेच्या सर्व व्यवस्थापनांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here