Maharashtra: शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा बट्ट्याबोळ

0
95
श्रीमती सावित्री देवी विद्या मंदिर वर्तक नगर, ठाणे पश्चिम
शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानाचा बट्ट्याबोळ

प्रतिनिधी-शैलेश कसबे

ठाणे – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ अभियान राबविण्यात आले. शाळांच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हे अभियान महाराष्ट्रभर घेण्यात आले. या योजनेअंतर्गत हजारो शाळा महाराष्ट्रातून सहभागी झाल्या होत्या.मात्र ठाणे शहरातून या योजनेअंतर्गत एकही शाळा पात्र झाली नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-विभाग-राज्य-सेवा-हक्/

या योजनेअंतर्गत ठाणे शहरातील एकही शाळा पात्र न होणे यातून पालिका शिक्षण विभागाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठाणे पश्चिम मधून श्रीमती सावित्री देवी विद्या मंदिर वर्तक नगर, ठाणे पश्चिम या शाळेने उत्कृष्ट तयारी करून सर्व निकषांचे पूर्तता केली आहे. परंतु शिक्षण विभागाच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे शाळांच्या सर्वांगीन विकासाला चालना देणे हा शासनाचा या योजनेचा हेतू साध्य होण्यास बाधा येत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, पालक व समाजातील शाळेचे हितचिंतक यांनी केलेल्या मेहनतीवर शिक्षण विभागाच्या सदोष मूल्यांकन पद्धतीमुळे अन्याय झाल्याची खंत शाळेचे मुख्याध्यापक श्री जालिंदर माने यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here