Maharashtra: शिवसेवा मित्र मंडळातर्फे शिवजयंती सोहळ साजरा

1
181
छत्रपती, ‘जाणता राजा’ ,शिवराज्याभिषेक सोहळा,
गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

ठाणे: विश्वनाथ पंडित

ठाणे – शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व, ह्या संस्थेतर्फे यंदा ५५ वा शिवजयंती उत्सव, येथील शिवनेरी मैदानात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांनी कधीही कोणाला व्यक्तिगत शत्रू मानलं नाही.  त्याच मुळे महाराजांचा संघर्ष हा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी वा कुणा जातीशी वा धर्माशी नव्हता.” ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री अजित मोघे ह्यांनी शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला, शिवसेवा मित्र मंडळाच्या व्यासपीठावरुन बोलताना वरील मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रकृती विरुद्ध विकृतीच्या संघर्षात प्रकृतीच्या पुन: स्थापनेसाठी होते. हिंदू धर्मातील संकल्पनेप्रमाणे,  ईश्वराने, मानव समुह म्हणून जगण्यासाठी जे नीतीनियम आखुन दिले आहेत त्या नियमांच्या संरक्षणासाठी, आपल्याला राज्य दिले आहे, ह्या उक्तीवर त्यांचा आजन्म विश्वास होता. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भविष्यात-रोजगार-मिळविण/

दरवर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवचरित्र विषयावर व्याख्यान ठेवण्याची परंपरा मंडळाने आजतागायत कायम राखली आहे. यंदा ‘शिवाजी महाराज आणि शत्रू पक्ष ‘ ह्या विषयावर बोलताना श्री अजित मोघे ह्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधले. शिवाजी महाराज हे निव्वळ महान सेनापतीच नव्हते तर राज्यकर्ते म्हणूनही तितकेच महान होते असं ते म्हणाले. महाराजांच्या शत्रूंचं उदात्तीकरण करणं हा आपल्या व्याख्यानाचा विषय नसून, मात्र महाराजांच्या शत्रूंचं योग्य मुल्यमापन केल्याशिवाय आपल्याला महाराजांची थोरवी कळणार नाही असेही श्री मोघे म्हणाले. शिवाजी महाराजांचे शत्रू सर्वच बाबतीत वरचढ असुनही शिवाजी महाराजांनी त्यांना का आणि कशी मात दिली हे सोदाहरण समजावून सांगितले. सरतेशेवटी औरंगजेबाशी तुलना करताना चारित्र्य, धैर्य, शौर्य, सावधपणा इ गुणांच्या बळावर महाराजांनी त्याकाळातील जगातील सर्वात मोठ्या आणि आर्थिक महासत्ता असलेल्या साम्राज्याचा विनाशाचा पाया खणला असं प्रतिपादन श्री अजित मोघे ह्यांनी केले.

या व्याख्यानाला संदीप लेले, सचिव महाराष्ट्र राज्य, भाजपा, पांडुरंग पाटील, माजी सभागृह नेते, ठामपा,  कृष्णकुमार कोळी, माजी सभागृह नेते, ठामपा, इतिहास अभ्यासक आणि ऐतिहासिक प्राचीन नाणी संग्रहाक  प्रशांत ठोसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, या व्याख्यानाच संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष श्री गिरीश राजे यांनी केले आणि सूत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष श्री अजय नाईक यांनी केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here