मुंबई – मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून श्रमकल्याण युग दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी, मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, रवींद्र मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ अध्यक्ष, रवींद्र मालुसरे मुंबई यांच्या हस्ते श्रमकल्याण युग दिवाळी अंकाचे उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून पारितोषिक कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी स्वीकारले.