Maharashtra: श्रीमती संगीता जिंदाल ब्रिटिश एशियन ट्रस्टमध्येभारतीय सल्लागार परिषदेच्या सदस्या म्हणून सहभागी

0
22
ब्रिटिश एशियन ट्रस्ट,
श्रीम. संगीता जिंदाल ब्रिटिश एशियन ट्रस्टमध्ये भारतीय सल्लागार परिषदेत सहभागी

मुंबई – ८ जुलै २०२४: जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदाल ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या भारत सल्लागार परिषदेत सहभागी झाल्या आहेत. या भूमिकेत, भारतातील ब्रिटिश एशियन ट्रस्टसोबत सहयोग करून त्या नावीन्यपूर्ण समाजोपयोगी आणि सीएसआर उपक्रमांद्वारे भारतात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत राहतील. श्रीमती संगीता जिंदाल या भारतीय व्यावसायिक धुरिणींच्या निवडक समूहाचा भाग असून, ग्लोबल ट्रस्टच्या सल्लागार सदस्य आहेत. भारतातील अत्यंत असुरक्षित समुदायांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर महत्त्वपूर्ण परिणामकारक काम करण्याकरिता ब्रिटिश एशियन ट्रस्टने खासगी क्षेत्र आणि मातृभूमीपासून दूर राहणारे दक्षिण आशियाई नागरिक यांच्यासोबत हात मिळविला आहे. सामाजिक अर्थकारणामधील अग्रगण्य कार्यासाठी प्रसिद्ध अशा या ट्रस्टचा मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. भारतातील काही सर्वात गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी बाजारातील विश्वासार्हता परिणामांवर आधारित वित्तपुरवठा केला आहे. गेल्या सहा वर्षांत ट्रस्टने शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार यांमध्ये भारतातील सर्वात मोठे विकास प्रभाव बॉन्ड्स (DIBs) विकसित केले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे. श्रीमती जिंदाल ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या इंडिया ॲडव्हायझरी कौन्सिलमध्ये इतर प्रतिष्ठित व्यावसायिक आणि सेवाभावी अग्रणी व्यक्ती यांच्यासोबत कार्यरत आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-आमदार-वैभव-नाईक-आणि-शिवसे/

ब्रिटिश एशियन ट्रस्टच्या इंडिया ॲडव्हायझरी कौन्सिलमधील त्यांच्या नियुक्तीबाबत बोलताना श्रीमती संगीता जिंदाल म्हणाल्या, “भारताच्या २०३० पर्यंत ७ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या प्रवासात विशेषत: महिला आणि मुले यांच्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य आणि रोजगाराच्या संधी यांसाठी समान प्रवेश सुनिश्चित करून आव्हाने आणि संधींचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या देशाच्या विकासाचा प्राधान्यक्रम आणि त्याच्या समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण करणे यामध्ये उत्तम संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. या विकासात्मक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सामाजिक वित्तपुरवठा एक महत्त्वाची भूमिका बजावेल. या दिशेने अर्थपूर्ण योगदान देण्याचा माझा प्रयत्न आहे.”

ब्रिटिश एशियन ट्रस्टचे भारताचे कार्यकारी संचालक भरत विश्वेश्वरय्या म्हणाले, “श्रीमती संगीता जिंदाल आमच्या भारत सल्लागार परिषदेत सहभागी झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या स्किल इम्पॅक्ट बॉण्डला त्यांनी दिलेल्या पाठबळावरून महिला सक्षमीकरणासाठीच्या नावीन्यपूर्ण कल्पनांच्या त्या दृढ समर्थक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. विकसित भारताच्या निर्माणाचे उद्दिष्ट असलेल्या शिक्षण, जीवनमान आणि स्त्री-पुरुष समानता या क्षेत्रातील आमच्या उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी श्रीमती जिंदाल यांचे ज्ञान आणि अनुभव बहुमोल ठरेल.”

जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि ब्रिटिश एशियन ट्रस्ट यांनी यापूर्वी स्किल इम्पॅक्ट बॉन्ड विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. कार्यशक्तीमध्ये अधिकाधिक महिलांना आणण्यावर लक्ष केंद्रित करून रोजगारासाठीचा हा भारतातील पहिला आणि सर्वात मोठा इम्पॅक्ट बाँड आहे. भारतातील तरुणांमधील रोजगारक्षमता आणि नोकरी टिकवून ठेवण्याबाबतच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी काम करणाऱ्या सहयोगींच्या गटाचा जेएसडब्ल्यू फाउंडेशन एक भाग आहे. श्रीमती संगीता जिंदाल या स्किल इम्पॅक्ट बाँडच्या आकांक्षा आणि कामगिरीचा आवाज आहेत. १४.४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा स्किल इम्पॅक्ट बाँड २०२१ मध्ये सादर करण्यात आला आणि ५०,००० तरुण भारतीयांपर्यंत पोहोचण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६०% महिला आहेत. त्यांना कौशल्याने तयार करून आणि चार वर्षांहून अधिक काळ रिटेल, वस्त्रप्रावरणे, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रांमध्ये रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत परिवर्तन कार्यक्रम भारतातील २४ राज्यांमधील २४,००० हून अधिक तरुणांपर्यंत पोहोचला असून, तिथे ७०% पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी महिला आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here