राष्ट्रीय, 09 ऑक्टोबर २०२४- एथर एनर्जी या इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात भारतातील आघाडीच्या कंपनी तर्फे आज त्यांच्या ४५० एक्स आणि ४५० ॲपेक्स स्कूटर्स वर सणासूदीच्या दिवसांसाठी विशेष ऑफर्स ची घोषणा केली. या ऑफर्स मध्ये एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी, फ्री एथर ग्रीड चार्जिंग, रोख सूट तसेच विशेष कॅशबॅक ॲफर्स चा समावेश असून ४५० एक्स आणि ४५० ॲपेक्स वर रु २५००० पर्यंत हे लाभ देण्यात येणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-शालेय-विभागिय-सायकलिंग-स/
एथर ४५० एक्सवरील विशेष ऑफर्स
आता जे ग्राहक प्रोपॅक ॲक्सेसरीज सह एथर ४५० एक्सची खरेदी करतील त्यांना १५००० रुपयांपर्यंत निश्वित लाभ मिळतील यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे –
● कोणत्याही अधिकच्या खर्चाशिवाय ८ वर्षांची एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी (ईबीडब्ल्यू)
● रु ५००० पर्यंत १ वर्षापर्यंत मोफत एथर ग्रीड चार्जिंग
● खरेदीवर थेट रोख ५००० रुपयांची सूट
या लाभांव्यतिरिक्त ग्राहकांना आता काही निवडक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर १०००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार असून यामुळे संपूर्ण लाभाची रक्कम ही २५००० रुपयांपर्यंत जाते.
४५० ॲपेक्स वरील विशेष ऑफर्स
४५० ॲपेक्स हे मॉडेल त्यांच्या ४५० उत्पादन श्रेणीतील आणि कार्यक्षमतेने युक्त मॉडेल आहे. सणासूदीच्या दिवसांसाठी एथर तर्फे ४५० एक्स साठी उपलब्ध असलेले सर्व असे रु २५००० पर्यंतचे लाभ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
एथरच्या ४५० सिरीजच्या स्कूटर्स मध्ये कार्यक्षमता, तंत्रज्ञनान आणि विश्वसनीयता यांचे मिश्रण आहे. ४५० एक्स ही २.९ केडब्ल्यूएच ची बॅटरी व ४५०एक्स मध्ये ३.७ केडब्ल्यूएच ची बॅटरी असून यामुळे अनुक्रमे १११ किमी आणि १५०किमी ची आयडीसी रेंज मिळते व सर्वाधिक वेग हा ताशी ९० किमी चा मिळतो. ४५० ॲपेक्स मध्ये आयडीसी रेंज ही १५७ किमीची असून सर्वाधिक वेग हा ताशी १०० किमीचा आहे. या स्कूटर्सच्या वैशिष्ट्यांमध्ये ऑटोहोल्ड, फॉलसेफ आणि १७.७ सेंमी (७इंच) टीएफटी टचस्क्रीन वर गुगल मॅप्स मंचाचे एकत्रिकरण उपलब्ध आहे. त्याच बरोबर आणखी वैशिष्ट्यांमध्ये व्हॉट्सॲप नोटिफिकेशन्स डॅशबोर्ड वर उपलब्ध झाल्याने चालकाला अजोड जोडणी मिळते. टो ॲन्ड थेफ्ट नोटिफिकेशन्स आणि फाईंड माय स्कूटर वैशिष्ट्यांमुळे सुरक्षा प्राप्त होऊन अनोखा अनुभव प्राप्त होतो. त्याच बरोबर ४५० ॲपेक्स मध्ये मॅजिक ट्वीस्ट फीचर आहे यामुळे तुम्ही एकाच थ्रॉटलचा वापर करुन गाडीची गती वाढवू आणि कमी करु शकतो.
एथर एनर्जी ने चालकांना सोपा आणि अजोड अनुभव देण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स तयार करण्यास सुध्दा वचनबध्द आहे. त्यांच्या नवीन फास्ट चार्जिंग अशा दुचाकीसाठीच्या नेटवर्कचे नाव एथर ग्रीड असून यामुळे आता संपूर्ण देशभरात २१५२ फास्ट चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध होतात. सध्या कंपनीचे देशात २३० एक्सपिरियन्स सेंटर्स असून यामध्ये ग्राहक एथर स्कूटर चालवून खरेदी करु शकतील. एथरची तमिळनाडूतील होसूर येथे दोन उत्पादन केंद्रे असून प्रत्येकी एक हे ॲसेम्ब्ली आणि बॅटरी उत्पादना सह तिसरे केंद्र हे महाराष्ट्रातील बिडकीन, ऑरिक, छत्रपती संभाजीनगर येथे आहे.