Maharashtra: साताऱ्याच्या पोरीनं PM मोदींसमोर चालवली मेट्रो! उदयनराजेंनीही ट्वीट करत केले कौतुक

0
157
साताऱ्याच्या पोरीनं PM मोदींसमोर चालवली मेट्रो! उदयनराजेंनीही ट्वीट करत केले कौतुक
साताऱ्याच्या पोरीनं PM मोदींसमोर चालवली मेट्रो! उदयनराजेंनीही ट्वीट करत केले कौतुक

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज ते रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी झाले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरु झाली. मेट्रोमुळे पुणेकरांचा तासाचा प्रवास काही मिनिटांवर आला आहे. दरम्यान यामुळे सातारकऱ्यांच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. याचं कारण असं की या सेवेदरम्‍यान आपल्‍यातील कौशल्‍याची चुणूक दाखविण्‍याची संधी साताऱ्याची कन्‍या असणाऱ्या अपूर्वा प्रमोद अलाटकर हिला मिळाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्थळ-पाहणी-आणि-गृहचौकशीद/

पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला
मेट्रोची ‘मास्‍क ऑन की’च्‍या साथीने लोकोपायलट अपूर्वाने सर्व तांत्रिक बाबींच्‍या मदतीने वनाझ येथून उद्‌घाटनाची फेरी पूर्ण केली. नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत ‘मास्क ऑन की’सह सज्ज होती. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अपूर्वाने ‘मास्क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्लिनिककडे मार्गस्थ केली.

साताऱ्यातील सुरेखा यादव या वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या महिला लोकोपायट ठरल्या होत्या. त्यांच्यानंतर आता साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनीही अपूर्वांचे ट्विट करत कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here