Maharashtra: साहित्यिक अनुज केसरकरांच्या हस्ते काळाचौकी येथील अहिल्या विद्यामंदिराचा पुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न

0
19
अहिल्या विद्यामंदिराचा पुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न
अहिल्या विद्यामंदिराचा पुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न

मुंबई I अनुज केसरकर

मुंबई : काळाचौकी येथील अहिल्या विद्यामंदिर या इंग्रजी माधमाच्या शाळेच्या पुस्तिका प्रकाशन सोहळा आज सकाळी दहा वाजता अहिल्या शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झाला. अहिल्या शाळेच्या या प्रथम पुस्तीका प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष स्थान प्रमोद मोरजकर यांनी भूषवले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पावशी-येथे-भूमिपूजन-कार्/

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक अनुज केसरकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना या शाळेच्या प्रथम पुस्तकेचे अभिनंदन करतानाच, आपल्या काव्यपंक्तीतुन शाळा आणि गुरूंची महती आपल्या शब्दातून अधोरेखित केली. गिरणगावातील ही शाळा शिक्षणा सोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्म आणि बौद्धिक विकासात मुलांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणते आहॆ. त्याबद्दल शाळेचे व मुख्याध्यापिका कृतीका मोरजकर यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कृतिका मोरजकर यांनी विद्यार्थ्यानी यार पुस्तिकेत लिहिलेल्या कवितांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

गिरणगावात मोठ्या कष्टाने उभी राहिलेली ही शाळा आज सर्वच क्षेत्रात देदीप्यमान अशी वाटचाल करत आहॆ. त्या वाटचालीत येथील शिक्षक, मुख्याध्यापक यांचे योगदान विषद करतानाच विद्यार्थी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पाहुण्यांचा सत्कार विद्यार्थ्यांचे सादरीकरण अशा उत्साहात पार पडलेल्या या पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन सलमा खान, कु. मेरील टिक्सेरा, नूतन माने यांनी केले. यावेळी संदीप गुरव, सलीम शेख यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षकगण व विदयार्थ्यांची विशेष उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here