Maharashtra: सी.बी.आय चौकशीची मागणी

0
78
सी बी आय,
सी बी आय चौकशीची मागणी

बोंढार येथील अक्षय भालेराव खून प्रकरणी सी. बी. आय. चौकशीची चर्मकार समाजाची मागणी !

नांदेड (प्रतिनिधी) : बोंढार ता. जि. नांदेड येथील बौद्ध युवक अक्षय श्रावण भालेराव यांच्या खून प्रकरणी पोलिसांच्या तपासावर विश्वास राहिला नसून या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत म्हणजे सी. बी. आय. चौकशीची मागणी चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबई-ठाणे-रायगड-आणि-पाल/

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या वतीने नांदेडच्या निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि नामदेव फुलपगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने बोंढार येथील खून प्रकरणी विविध मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले. 

 बोंढार येथे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षानंतर प्रथमच अमृत महोत्सवी वर्षात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याचा राग मनात धरुन गावातील कांही जातीयवादी लोकांनी अक्षय श्रावण भालेराव या युवकाची भोसकून हत्त्या केली. यात आवश्यक ती कलमे लावण्यात आली नाहित, नऊपेक्षा जास्त असलेल्या सर्व आरोपिंना अद्याप अटक करण्यात आली नाही व गुन्ह्यातील शस्त्रे जप्त करण्यात आली नाहित, पोलिसांची ही उदासिनता पाहता सी. बी. आय. चौकशी झाली तरच तपास योग्य दिशेने होऊन न्याय मिळू शकतो असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिष्टमंडळात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नामदेव फुलपगार, किरणकुमार हिवरे, गंगाधर गंगासागरे, बालाजी फुलपगार, हणमंत उतकर, बाबू नरहिरे, राजू धडके आदिंचा समावेश होता. सोशल मिडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकल्या जात आहेत, कांहीजण उघड उघड आरोपींचे समर्थन करत आहेत, चिथावणी देत आहेत अशा समाजकंटकांवर नजर ठेऊन कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here