मुंबई : सॅण्डहर्स्ट रोड येथील बी वॉर्ड येथे रविवार दिनांक 7 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहेत. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.
आज महिला बचत गट उत्तम प्रकारे वस्तूंची निर्मिती करत आहेत. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे बचतगटांची मागणी लक्षात घेता स्थानिक ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच महापुरूष दादाभाई सहकारी गृहनिर्माण संस्था, परळ यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार स्थानिक प्रशासनाने विकासकाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. आज १४८९ तक्रारीपैकी दाखल झाल्या असून जागीच १५५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.