मुंबई: १६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकचे प्रक्षेपण सर्व भाषांमध्ये दाखवले जात आहे. मात्र पुन्हा एकदा मराठी भाषेला स्टार-स्पोर्टस वाहिनीकडून डावलण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने स्टार-स्पोर्टस वहिनीला पत्र देऊन मराठी भाषेचा समावेश करण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली होती. ही परवानगी घेण्यासाठी ना. म. जोशी पोलीस स्थानकामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पत्र देण्यात आले होते मात्र यावर वाहिनीशी कोणतीही चर्चा न करता एमएनटीएसचे अध्यक्ष श्री. सतीश रत्नाकर नारकर, सरचिटणीस प्रमोद मांढरे यांना पोलीस प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-दापोली-नगर-पंचायतीत-५-को/
आज एकीकडे सर्व भाषांमध्ये टी२० विश्वचषकाचे प्रक्षेपण हिंदी, तामिळ आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये दाखवण्यात येत असताना मराठीला दुय्यम वागणूक का ? असा प्रश्न एमएनटीएस ने पत्राद्वारे चॅनेलला विचारला होता तसेच हेच पत्र चॅनेलला देण्यात येणार होते मात्र या विरोधात पोलीस प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेत एमएनटीएसचे अध्यक्ष सतीश नारकर आणि सरचिटणीस प्रमोद मांढरे नोटिसा बजावल्या आहेत. आज मराठी मातीने अनेक हिरे या क्रिकेट जगताना दिलेले असताना सुद्धा आज मराठी भाषेवर अन्याय का असा सवाल नवनिर्माण सेनेने विचारला आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtr-सर्व-ठाकरेंनी-एकत्र-येण/
याच पार्श्वभूमीवर स्टार-स्पोर्ट वहिनीला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या सयुक्तीरीत्या हे आंदोलन करण्यात येणार होते मात्र पोलीस प्रशासनाने टेलिकॉम सेनेची कोणतीही बाजू न ऐकता एकतर्फी निर्णय दिला आहे मात्र तरीही एमएनटीस आपल्या आंदोलनावर ठाम असून येत्या शुक्रवारी सकाळी परळ येथील स्टार-स्पोर्टस वाहिनीच्या कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सतीश नारकर,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मनसे तथा रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगेतले.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-कोंकणातील-पहिला-सर्वात/


