Maharashtra: स्टेजला पुन्हा झळाळी : भारतातील वैशिष्ट्यपूर्ण रॉक ‘एन’ रोल फेस्टिव्हल आयरॉक सोबत जावा येझदी मोटरसायकल्स पुन्हा एकत्र

0
41
भारतातील वैशिष्ट्यपूर्ण रॉक 'एन' रोल फेस्टिव्हल आयरॉक सोबत जावा येझदी मोटरसायकल्स पुन्हा एकत्र
भारतातील वैशिष्ट्यपूर्ण रॉक 'एन' रोल फेस्टिव्हल आयरॉक सोबत जावा येझदी मोटरसायकल्स पुन्हा एकत्र

मुंबई, ०९  नोव्हेंबर २०२३ : रॉक ‘एन’ रोल आणि मोटारसायकल यांच्यातील अतूट संबंधाची मुळे खोलवर रुजलेली आहेत. तुमच्या वडिलांचे विंटेज डेनिम जॅकेट आणि आयकॉनिक एव्हिएटर शेड्सइतकी ती खोल आहेत. ज्या युगात बंडखोर आणि रायडर्स यांनी सहमतीच्या जोखडातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते खरे क्रांतिकारक म्हणून उदयास आले. या उल्लेखनीय वारशाचा सन्मान करत, जावा येझदी मोटरसायकलने भारतातील सर्वात प्रतिष्ठित रॉक ‘एन’ रोल फेस्टिव्हल, इंडिपेंडन्स रॉकसोबत आपली नूतन भागीदारी अभिमानाने घोषित केली आहे. महोत्सवाचे हे २९ वे सत्र आहे.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-गल्फ-सिनट्रॅक-आ/

‘वुडस्टॉक ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा दोन दिवसीय रॉक फेस्टिव्हल ०४-०५ नोव्हेंबर २०२३ रोजी दक्षिण मुंबईतील लोकप्रिय ठिकाण बेव्ह्यू लॉन्स, प्रिन्सेस डॉक, माझगाव येथे आयोजित करण्यात आला होता. फेस्टिव्हलमध्ये हेड बॅंगिंग म्युझिक, मोटारसायकल चालवण्याची संस्कृती आणि समकालीन जीवनशैली यांचा उत्तम मिलाफ दिसून आला.

जावा येझदीच्या फिरस्त्या भटक्यांच्या ‘शोध’ तत्त्वज्ञानाशी सुसंगत आणि नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत, जावा येझदी मोटरसायकलने महोत्सवादरम्यान ‘जावा येझदी न्यू साउंड स्टेज’ येथे देशव्यापी बँड हंटद्वारे अभिमानाने उदयोन्मुख प्रतिभेला पाठिंबा दिला. दरम्यान, परिक्रमा, आगम, भयनक मौत, स्वरथमा या भारतीय रॉक सर्किटमधील काही मोठ्या नावांनी आणि इतर अनेकांनी देशातील या सर्वात मोठ्या रॉक-एन-रोल महोत्सवात उपस्थितांसमोर  आनंददायक कामगिरी सादर केली.

विविध शैली आणि भाषांमधील नवीन कलागुणांचे सादरीकरण हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. या महोत्सवात भारतातून आणि अगदी नेपाळमधील कलाकारही होते. जोडीला, या महोत्सवात भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीत, इलेक्ट्रिक गिटार रिफ आणि डायनॅमिक ड्रमिंगसह मृदंगम आणि बासरी सारख्या वाद्यांचा मिलाफ यांच्या समृद्ध कलाकारीचा मागोवा देखील घेण्यात आला.

जावा येझ्दी स्टेजच्या जोडीला जावा येझ्दी कम्युनिटीसाठी महोत्सवात जावा 42 बॉबर ब्लॅक मिरर, जावा 42, येझ्दी रोडस्टर आणि येझ्दी अॅडव्हेंचर यासारख्या काही वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन करणारे अनुभव क्षेत्र तयार केले गेले. त्यांच्या मोटरसायकलसह, त्यांच्या अनुभव झोनमध्ये ब्रँडच्या विस्तृत श्रेणीतील जीवनशैली उपकरणे देखील प्रदर्शित करण्यात आली. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला १०० जावा येझदी कम्युनिटी सदस्य उपस्थिती होते. ते देशभरातील विविध शहरांमधून त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते.

जावा येझदी मोटरसायकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष सिंग जोशी यांनी या सांस्कृतिक भागीदारींमध्ये ब्रँडच्या सहभागाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “जावा येझदी मोटरसायकल्समध्ये, आम्ही प्रतिष्ठित मोटरसायकल ब्रँडचे त्यांच्या पूर्वीच्या वैभवासाठी पुनरुज्जीवन केले आहे. इंडिपेंडन्स रॉक सारख्या महोत्सवांना आमच्या इतिहासात विशेष स्थान आहे आणि आम्ही नवीन पिढ्यांसाठी असे अनुभव परत आणण्यासाठी वचनबद्ध आहेत. खूप आधीच्या काळापासून बोलायचं झालं तर  मोटरसायकल चालवणे आणि रॉक-एन-रोल या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि इंडिपेंडन्स रॉकसोबतची आमची भागीदारी आमच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी उत्तम प्रकारे जुळते. अशी सांस्कृतिक भागीदारी सीमा एक्सप्लोर करण्याची आणि पारंपरिक मोटरसायकल परिक्षेत्र ओलांडण्याच्या जावा येझदी मोटारसायकल्सच्या क्षमतेची पावती आहे.”

जावा येझदी मोटरसायकलच्या सांस्कृतिक भागीदारीमध्ये प्रवेश करण्यातून आपल्या ग्राहकांचे जीवन समृद्ध करण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. तसेच अस्सलता, साहस आणि नॉस्टॅल्जियाची भावना वाढीला लागते. अलीकडील यशस्वी सांस्कृतिक भागीदारी जसे की – लोकप्रिय कोवेलॉन्ग सर्फ फेस्टिव्हल, ग्राफिटी आर्ट कॅम्पेन, स्केटबोर्डिंगला तसेच लडाख इंटरनॅशनल म्युझिकल फेस्टिव्हल [LIMF) सारखे संगीतमय कार्यक्रम प्रोत्साहन देणे यातून त्यांची बांधिलकी आणखी अधोरेखित होते.

जावा मोटरसायकल लाइन-अपमध्ये जावा, जावा 42, जावा 42 बॉबर आणि जावा पेराक यांचा समावेश आहे.

येझदी मोटरसायकल लाइन-अपमध्ये – येझदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here