‘Maharashtra: स्विच इआयव्ही २२’ (SWITCH EiV २२) चा पहिला संच बेस्ट (BEST) ला वितरित !

0
68
‘स्विच इआयव्ही २२’ (SWITCH EiV २२) चा पहिला संच बेस्ट (BEST) ला वितरित !

मुंबई, भारत – १३ फेब्रुवारी, २०२३: हिंदुजा समूहाची एक कंपनी आणि भावी पिढीतील आधुनिक कार्बन इलेक्ट्रिक बस आणि हलके व्यावसायिक वाहन निर्माता स्विच मोबिलिटी लिमिटेड ने आज स्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) चा पहिला संच मुंबईच्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ला वितरित केला. हे पहिल्या संचाचे वितरण गेल्या सात दशकांपेक्षा अधिक काळापासून भारतातील डबल डेकर बसचे सर्वात मोठे बस ऑपरेटर असलेल्या बेस्ट (BEST) साठी २०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या ऑर्डरचा एक भाग आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-जागा-बघायला-आली-नि-कॉटेजव/

स्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) ही भारतातील पहिली आणि अद्वितीय इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बस आहे जी स्विचच्या जागतिक इलेक्ट्रिक बस अनुभवाचा उपयोग करून भारतात डिझाईन करून येथेच विकसित व उत्पादित केली आहे. स्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) नवीनतम तंत्रज्ञान, अति आधुनिक डिझाईन, सर्वोच्च सुरक्षितता आणि सर्वोत्कृष्ट सुविधांनी युक्त आहे.

स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश बाबू म्हणाले, ऑगस्ट २०२२ मध्ये लॉंच करण्यात आलेले भारतातील पहिले इलेक्ट्रिक डबल डेकर  स्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) सारख्या नावीन्यपूर्णतांत्रिक दृष्ट्‍या प्रगत उत्पादनांद्वारे स्विच मोबिलिटी लिमिटेड डिकार्बनायझेशन करून शून्य कार्बन दळणवळण आणण्याच्या आपल्या स्वप्नाशी वचनबद्ध आहे. आज २०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस पैकी पहिला संच बेस्ट (BEST) ला वितरित करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. स्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) मुंबईतील डबल डेकर बसेस चा वारसा या दशकात आणि त्यानंतरही पुढे नेईल आणि अलीकडच्या काळात बेस्टने सुरू केलेल्या शाश्वत व पर्यावरणपूरक पाऊलखुणा वाढविण्याच्या मोहिमेला आणखी समृद्ध करेल. आम्हाला ठाम विश्वास आहे कीस्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) सर्वोत्तम अशा ग्राहकप्रणीत सोई सुविधा आणि ग्राहकांच्या आनंदासह मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा कायापालट करेल आणि मुंबईकरांसाठी अनेक प्रतिष्ठितप्रेमळ आठवणी परत आणेल.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) चे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, बेस्ट साठी भारतातील पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणे हा आमच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या बसेस ची खरेदी नॅशनल क्लीन एयर प्रोग्राम (NCAP) अंतर्गत, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या हरित आणि स्वच्छ दळणवळण या दृष्टिकोनाला पूर्ण करण्यासाठी केली आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक जागतिक दर्जाच्या समान करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबईमध्ये आणित असलेल्या या इलेक्ट्रिक डबल डेकर वातानुकूलित बसेस मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देतील. लाइव्ह ट्रॅकिंग उपकरणसीसीटीव्ही कॅमेरे आणि खास महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटण अशा सुविधा आणि टॅप इन-टॅप आउट’ या सुविधेसह या बसेस शतप्रतिशत  डिजिटल असतील आणि १००% हरित उर्जेवर (सौरऊर्जा) चालतील.

स्विच इलेक्ट्रिक डबल डेकर मध्ये आधुनिक व अत्यंत प्रगत आर्किटेक्चरसह वजनाने हलके असलेला असा अॅल्युमिनियम ढाचा आहे. फक्त १८% केर्ब वेट (Kerb weight) वाढीसह ही डबल डेकर बस सिंगल डेकर बसच्या तुलनेत जवळपास दुप्पट प्रवाश्यांना घेऊन जाऊ शकते.  समकालीन स्टाइल, अल्हाददायक असे उत्तम इंटिरीअर आणि एक्सटिरीअरसह इलेक्ट्रिक डबल डेकर मध्ये समोरील आणि मागील बाजूस रुंद दरवाजे, दोन जीने आणि नवीनतम सुरक्षा मानकांचे पालन करणारा आपत्कालीन दरवाजा आहे. भारतातील उष्ण हवामानात यातील वातानुकूलित व्यवस्था (AC) प्रभावीपणे थंडावा देते तर यामध्ये दिलेल्या पद चिन्हांमध्ये जास्तीत जास्त ६५ प्रवाशांसाठी योग्य प्रमाणात आसनव्यवस्था प्रदान केली आहे.  प्रत्येक आसनावर वजनाने हलके कुशन असून आतील भाग प्रवाशांच्या सोईसाठी कार प्रमाणे आरामदायी आहे. ही  अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल डेकर बस शहरी प्रवासासाठी एक आदर्श उपाय म्हणून काम करते कारण ती  त्यात बसलेल्या प्रत्येक प्रवाश्यांसाठी कमी रस्ता, कमी टर्मिनल आणि डेपोमध्येदेखील कमी जागा व्याप्ते.

पॉवरिंग स्विच इआयव्ही २२ (SWITCH EiV २२) हा २३१ केडबल्यूएच (kWh) क्षमता, २ स्ट्रिंग, लिक्विड कूल्ड, दुहेरी गन चार्जिंग प्रणालीसह उच्च घनता एनएमसी केमिस्ट्रि बॅटरी पॅक आहे. हे इलेक्ट्रिक डबल डेकर बसला  शहरांतर्गत कामकाजासाठी २५० किमी पर्यंतच्या रेंजसाठी सक्षम करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here