आपल्या संस्कृतीत सणांची फार मोठी परंपरा आहे. प्रत्येक व्यक्ती आणि समाज या सणासुदीच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. होळी, धूलिवंदनाच्या सणाला प्राचीन संदर्भ, ऐतिहासिक महत्त्व आहे. राज्यातल्या गावागावात, देश-विदेशात साजरा होणाऱ्या सणाच्या निमित्ताने एक वेगळे वातावरण आपल्याकडे पाहायला मिळते. त्यामुळेच सर्वांना एकत्र आणणारा हा सण प्रत्येकाचा सन्मान, निसर्गाचा समतोल राखत साजरा केला पाहिजे.
होळीसाठी वृक्षतोड न करणे, धूलिवंदनासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करणे, रंग लावताना डोळ्यांना, शरीराला इजा होणार नाही याची काळजी घेणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, निसर्गाचा समतोल राखत पर्यावरणपूरक सर्वांनी होळी हा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करूया