
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन
प्रतिनिधी -पांडूशेठ साठम
सिंधुदुर्ग– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे सोमवार दि. १२ जून रोजी सकाळी ११:३० वा. ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. तब्बल १२१ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध केलेले नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक उपलब्ध न झाल्यास सदर शाळा काही काळाने बंद होणार असून यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पोलीसांचा-लाठीचार्ज-म्/

