Maharashtra: 1 जुलैपासून होणार ‘सॅटेलाईट’ जमीन मोजणी; शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरीला पुर्णविराम

0
17
1 जुलैपासून होणार 'सॅटेलाईट' जमीन मोजणी; शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरीला पुर्णविराम
1 जुलैपासून होणार 'सॅटेलाईट' जमीन मोजणी; शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरीला पुर्णविराम

मुबंई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून आता 1 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या भूमि अभिलेख कार्यालयात रखडलेल्या शेतजमिनीच्या मोजण्या विनानिलंब 15 दिवसांच्या आत सॅटेलाईटच्या माध्यमातून होणार आहे. आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे या शेतजमीन मोजणी होणार असल्याची माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/राज्यपाल-नियुक्त-12-आमदारा/

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते. शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी केल्यानंतर झालेल्या खुणाखुणा काढून टाकणे, वारंवार जमिनीची मोजणी करावी लागणे यासह मोजणीशी निगडित वादाचे प्रकार आता थांबणार आहेत. भूमिअभिलेख अर्थात मोजणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत रामबाण उपाय शोधला आहे.यातून जमिनीची सॅटेलाईटच्या माध्यमातून मोजणी होणार असून, यामुळे मोजणीच्या वेळेत निम्म्याने बचत होणार आहे. शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशेही मिळणार असून मोजणीसाठी शेतकऱ्यांची होणारी त्रेधातिरपीट थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला जात असतानाच जमीन मोजणीच्या प्रक्रियेतही त्याचा अंतर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या कामासाठी खोळंबा होणार नसून जमीन मोजणीसाठी अर्ज दिल्यानंतर किमान 15 दिवसांत ही मोजणी केली जाणार आहे. नवीन तंञज्ञानामुळे वेळेची बचत होवून काटेकोरपणे ही मोजणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरी व वादविवादाला या मोजणीतून पुर्णविराम मिळणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here