Maharashtra: 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या, कोल्हापूर हादरलं

0
34
Puma कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री
Puma कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री

कोल्हापूर: बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलेल असतानाच कोल्हापूरमध्येही असाच एक घृणास्पद आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर येथे दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना कोल्हापूरच्या शिये येथे घडली आहे. शिये गावातील राम नगर परिसरातील पीडित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. https://sindhudurgsamachar.in/kokan-नवी-मुंबई-शिवसेना-संपर्क/

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही 10 वर्षांची ही मुलगी काल दुपारपासूनच बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर आज सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या करण्यापूर्वी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यामुळे लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.

दरम्यान या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अधीश्रक महेंद्र पंडित हे घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू असून यामध्ये इतर आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

एकीकडे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होत असतानाच कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या शिये गावात मात्र घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here