मुंबईतील कमी उत्पन्न असलेल्या घरांना स्वच्छता आणि आरोग्यस्वास्थ्य विषयक उपाययोजना पुरवणारे सुविधा हे एक उद्देशपूर्ण, शाश्वत आणि अशा प्रकारचे पहिलेच शहरी जल, स्वच्छता आणि आरोग्य समुदाय केंद्र आहे.
मुंबई, ऑक्टोबर 2024: धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि JSW फाउंडेशन मुंबईत 10 नवीन सुविधा केंद्रे स्थापन करणार असून अशा प्रकारचे पहिले केंद्र आज घाटकोपर येथील जागृती नगर येथे सुरू करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-परतीच्या-पावसाने-केला-कह/
HUL ने 2016 मध्ये सुरू केलेल्या यशस्वी सुविधा मॉडेलवर हा उपक्रम आधारित आहे. हे मॉडेल सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि HSBC इंडिया सोबत भागीदारीत 17 केंद्रे चालवते. त्याचा प्रभाव दरवर्षी 450,000 हून अधिक लोकांवर होत आहे.
नवीन सुविधा केंद्रांची प्रमुख वैशिष्ट्ये:
सुविधा केंद्रे कमी उत्पन्न असलेल्या समुदायांच्या सर्वसमावेशक स्वच्छता आणि आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली असून येथे सर्व अत्यावश्यक सेवा एकाच ठिकाणी दिल्या जातात. या केंद्राची उभारणी मानवतेच्या मूल्याशी निगडीत सिद्धहस्त सर्वांगीण दृष्टीकोनातून करण्यात आली असून समाजघटकांबरोबर काम करत महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. समाजाचा मजबूत सहभाग आणि चांगल्या कृती उपाययोजना यांच्या साथीने या सुविधांमुळे वापरकर्त्यांमध्ये समाधान आणि आरोग्यविषयक परिणामात सुधारणा दिसून आली आहे.
- 24×7 प्रवेश: नवीन केंद्र आणखी 20,000 लोकांना फायदा करून देईल, 24×7 सुरू असणारी सुरक्षित शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, आंघोळीसाठी शॉवर्स आणि लॉन्ड्री सेवा प्रदान करेल.
- परवडणाऱ्या सुविधा: या सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध असतील.
- महिलांच्या, मुलांच्या, वृद्धांच्या आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन केलेले सर्वसमावेशक डिझाइन.
- महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित: केंद्रात पुरुष, महिला आणि मुलांसाठी वेगळे शौचालये आहेत आणि वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, शौचालयात आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘पॅनिक बटण’ लावले आहे.
- शाश्वतता केंद्रस्थानी: 140 दशलक्ष लिटर पाणी आधीच आमच्या केंद्रांद्वारे बचत करण्यात आले आहे. ही केंद्रे सौर उर्जेवर चालतात.
- वर्तन बदल कार्यक्रम: HUL आणि JSW फाउंडेशन या केंद्राच्या आसपासच्या समुदायांमध्ये वैयक्तिक आणि एकूणच समुदायाच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी व्यापक वर्तन बदल कार्यक्रम चालवतील.
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य शाश्वतता अधिकारी श्री. शशिधर वेंपला म्हणाले, “JSW फाउंडेशन सोबतच्या भागीदारीत आमचे पहिले सुविधा केंद्र सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे मुंबईतील 18 वे केंद्र आहे. शहरातील वंचित समुदायांना सुरक्षित आणि सन्मानजनक स्वच्छता सेवा पुरविण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही भागीदारी केवळ अत्यावश्यक आरोग्य स्वच्छता सुविधांमध्ये प्रवेश वाढवत नाही तर शाश्वतता आणि एकूणच समाजाचे सक्षमीकरण यासाठी असलेली आमची समर्पित भावना यातून दिसून येते. प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात प्रगती करण्याची संधी सुनिश्चित करत एकत्रितपणे, आम्ही एक आरोग्यदायी, अधिक सर्वसमावेशक भविष्याची वाट मोकळी करत आहोत.”
जागृती नगरमधील पहिल्या एकत्रितरित्या सुरू केलेल्या सुविधा केंद्राबद्दल JSW फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी सक्सेना म्हणाले, “सुविधा केंद्रे स्थापन करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतची आमची भागीदारी यातून विशेषतः महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून स्थानिक समुदायांच्या सक्षमीकरणासाठी असलेली JSW फाउंडेशनची बांधिलकी प्रतिबिंबित होते. आम्हाला विश्वास आहे की ही भागीदारी म्हणजे मुंबईतील लोकांसाठी गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या किंमतीत स्वच्छता सुविधा मिळण्याच्या समानतेसाठी दीर्घकाळ चालणारा मार्ग ठरेल.”
सुविधा केंद्राबद्दल अतिरिक्त तपशील:
- * या केंद्रांद्वारे 450,000 हून अधिक पुरुष, महिला आणि मुलांना सध्या स्वच्छ स्वच्छता सुविधा सेवा मिळत आहे.
- * आतापर्यंत 17 केंद्रांद्वारे एकूण 140 दशलक्ष लिटर पाणी वाचले आहे.
- * 10 पैकी 9 वापरकर्त्यांना सुविधा केंद्र सहज उपलब्ध आणि समावेशक वाटतात.
- * 98% महिलांना वाटते की सुविधा केंद्र त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित आहे.
- * सुविधा केंद्र वापरणाऱ्यांमध्ये अतिसार आणि मूत्र मार्गाच्या संसर्गाच्या घटना सुमारे 50% ने कमी झाल्या आहेत.
- * सुविधा सेवांबाबत 90% पेक्षा जास्त महिलांमध्ये आणि मुलांमध्ये समाधान.