Maharashtra: CASE IH ने ऊसाच्या शाश्वत शेतीसाठी ‘उन्नत कौशल उपक्रम’ सादर केला

0
27
CASE IH ने ऊसाच्या शाश्वत शेतीसाठी ‘उन्नत कौशल उपक्रम’ सादर
ब्रॅंड या उपक्रमांतर्गत ३०० कृषी यंत्र चालकांना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऊसाच्या शेतीतून इष्टतम परिणाम मिळवायला प्रशिक्षण

–         ब्रॅंड या उपक्रमांतर्गत ३०० कृषी यंत्र चालकांना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऊसाच्या शेतीतून इष्टतम परिणाम मिळवायला प्रशिक्षण देईल.

–         प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण भारतातील ऊस तोडणी यंत्रचालकांसाठी खुला आहे.

पुणे, ३ एप्रिल, २०२३ : सीएनएच इंडस्ट्रीयलचा ब्रॅंड आणि कृषी उपकरणांमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या CASE IH ने उन्नत कौशल-ऊस तोडणी चालक  प्रशिक्षण या नवीन कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमाची घोषणा केली. महाराष्ट्रातील बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राच्या (KVK) सहकार्याने ऊस तोडणी यंत्र चालकांसाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि मशीन अपटाइम जास्तीत जास्त करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कापणी उपकरणाच्या इष्टतम वापरावर प्रशिक्षण देऊन शाश्वत ऊस शेतीला प्रोत्साहन देणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-डिस्ने-स्टारवर-ट/

प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण भारतातील ऊस तोडणी यंत्रचालकांसाठी खुला आहे

सुरुवातीच्या तुकडीत बारामती, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील १५० शेतकरी होते. पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम १८ ते ३५ वर्षे वयोगटातील ३०० यंत्र चालकांना किमान शैक्षणिक पात्रतेसह प्रशिक्षित करण्यासाठी तयार आहे. हा कार्यक्रम त्यांना रोजगारक्षम कौशल्ये शिकवण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रातील कुशल कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी सज्ज आहे.

सीएनएच इंडस्ट्रीयलच्या एग्रिकल्चर इंडियाचे विक्री आणि विकास प्रमुख श्री. संदीप गुप्ता म्हणाले, “सीएनएच इंडस्ट्रीयलमध्ये आम्ही कृषी उद्योगात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत. उन्नत कौशल कार्यक्रमाद्वारे ऊस तोडणी चालकांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्याचे आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उपकरणे अधिक कार्यक्षमतेने चालवता येतील, ज्यामुळे उत्पादकता वाढेल, खर्च कमीतकमी येईल आणि अखेर शाश्वत शेती व्यवस्था निर्माण होईल. आम्हाला आशा आहे की, या उपक्रमाद्वारे या भागातील आणखी अनेक शेतकऱ्यांवर परिणाम होईल.”

हा कार्यक्रम विशेषतः भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेती यंत्र चालकांना प्रशिक्षित करण्याच्या कंपनीच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या वर्षी, त्यांच्या वेगवेगळ्या सीएसआर उपक्रमांचा एक भाग म्हणून, कंपनीने हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील ६०० शेतकऱ्यांना आर्थिक साक्षरता, कृषी यांत्रिकीकरण, बायोमास व्यवस्थापन आणि राज्य कृषी अनुदान या विषयांवर प्रशिक्षण दिले आहे.

CASE IH जवळपास ८० वर्षांपासून यांत्रिक ऊस कापणीमध्ये जगात आघाडीवर आहे. भारतात उपलब्ध असलेले Austoft ४०१० Maxx चांगल्या कापणी गुणवत्तेसाठी आणि सुधारित उत्पादकतेसाठी तयार केले आहे आणि त्याच्या हलक्या वजनाच्या आणि नेटक्या डिझाईनमुळे ऊस उत्पादकांना विविध क्षेत्रीय परिस्थितीत कापणीसाठी जास्त लवचिकता मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here