Maharashtra: L&T-SuFin ने B2B ई कॉमर्ससाठी विक्रेता सुविधा ॲपचा शुभारंभ 

0
21
su-fin seller app
L&T- SuFin ने B2B  ई कॉमर्ससाठी विक्रेता सुविधा ॲपचा शुभारंभ 

मुंबई, 09 ऑक्टोबर, 2024: औद्योगिक आणि बांधकाम उत्पादनांसाठी भारतातील अग्रगण्य एकात्मिक B2B डिजिटल मार्केटप्लेस एल अँड टी-सु फिनने SuFin सेलर सुविधा हे ॲप लॉन्च  केले  आहे. विक्री प्रक्रिया सुव्यवस्थित करून व्यवसायांना, विशेषतः एमएसएमईना सक्षम करण्यासाठी हे ॲप डिझाइन केले आहे. हे ॲप विक्रेत्यांसाठी कामे सोपी करणे, ग्राहक प्रतिबद्धता वाढवणे आणि व्यवसाय ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करणे अशा विविध वैशिष्ट्यांनी पूर्ण आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-उपसा-जलसिंचन-योजनांच्य/

ॲप स्टोअर आणि गूगल प्ले या दोन्हीवर SuFin विक्रेता सुविधा हे ऍप उपलब्ध आहे. विक्रेत्यांना त्यांचे कार्य सुरळितपणे सुरू ठेवण्यास मदत करते. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ग्राहकाच्या मागण्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, ट्रॅकिंगसाठी मध्यवर्ती डॅशबोर्ड, प्लेसमेंटपासून वितरणापर्यंत रिअल-टाइम ऑर्डर मॉनिटरिंग, एक अंतर्ज्ञानी परतावा व्यवस्थापन प्रणाली आणि डायनॅमिक  पेमेंट  व्यवस्थापन मॉड्यूल यांचा समावेश आहे.

ॲपच्या वापरकर्त्यांसाठी सोयीच्या फीचर्समुळे विक्रेते त्यांच्या ऑपरेशनच्या प्रत्येक पैलूवर अखंडपणे देखरेख करू शकतात. ऍपची ही वैशिष्ट्ये केवळ दैनंदिन कामकाजात सुधारणा करत नाहीत तर  विक्रेत्यांना त्यांची विक्री, यादी तसेच ग्राहक संबंध व्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी अधिक चांगली दृश्यमानता, नियंत्रण आणि ऑटोमेशन राखण्यात मदत करतात.

लॉन्चवर भाष्य करताना, श्री. भद्रेश पाठक, बिझनेस हेड – L&T-SuFin, म्हणाले: “SuFin विक्रेता सुविधा ॲप आमच्या डिजिटल मार्केटप्लेसचा नैसर्गिक विस्तार आहे. देशभरातील व्यवसायांसाठी विक्रीचा अनुभव सुलभ करणे आणि त्याचे संवर्धन करणे, हाच याचा उद्देश आहे.  वापरणाऱ्यांसाठी अत्यंत सोयीची फीचर्स देऊन – केंद्रीकृत RFQ बोर्ड, रिअल-टाइम ऑर्डर ट्रॅकिंग आणि स्वयंचलित रिटर्न व्यवस्थापन आदी – आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की  विक्रेते मानवी  हस्तक्षेपाच्या त्रासाशिवाय त्यांचा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.

लॅपटॉप/डेस्कटॉपद्वारे ॲप सुरू करण्यासाठी: https://www.lntsufin.com

मोबाईलवर ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक: https://onelink.to/lntsufin-seller-app

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here