ओरोस: पोलीस भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होता यावे, या दृष्टीकोनातून पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-श्री-अंकुश-तुकाराम-कदम/
पोलीस भरती 2021 मधील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार आवेदनपत्रे स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली होती. पोलीस भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होता यावे, या दृष्टीकोनातून पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.