मुबंई- पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अंगणवाड्यांचे प्राथमिक शाळांमध्ये विलिनीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा हा एक भाग असून, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुमारे 1 लाख अंगणवाड्या असून, तेथे बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्यातील 55 हजार अंगणवाड्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक शाळेला जोडल्या जाणार आहेत. उर्वरित 45 हजार अंगणवाड्या टप्प्याटप्प्याने प्राथमिक शाळांमध्ये विलीन केल्या जातील.ttps://sindhudurgsamachar.in/अखिल-भारतीय-साने-गुरुजी-क/
प्रशिक्षित शिक्षक नेमणार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूर्व प्राथमिकसाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे. अंगणवाड्यातील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नेमले जातील. अंगणवाडी शिक्षिकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
अंगणवाडीतून प्राथमिक शाळेत जाताना मुले घाबरुन जातात. अंगणवाड्या शाळांमध्ये विलीन केल्यानंतर मुलांना एकाच शाळेत जाण्याची सवय होईल. त्यांना नवीन वातावरणाचा अनुभव येणार नाही. यासाठी पुढील वर्षापासून हा निर्णय राबवला जाणार आहे.
[…] […]
[…] […]