विश्वनाथ पंडित
बदलापूर : (विश्वनाथ पंडित) जॉय सामाजिक संस्था मुंबई या समाजाप्रती सातत्याने कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थेला नुकताच सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार २०२२ दिला जाणार असल्याचे जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी जाहीर केले. बदलापूर येथे २० नोव्हेंबर रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक कार्यक्रम पार पडणार असून यावेळी महाराष्ट्रातील अग्रेसर राहून काम करणाऱ्या अन्य सामाजिक संस्थांचाही गौरव करण्यात येणार आहेत असे तिरपणकर यांनी सांगितले.
जॉय संस्था मागील अनेक वर्षांपासून राज्यात सातत्याने समाजातील गोर, गरीब वंचित घटकांसाठी कार्य करीत असून प्रामुख्याने त्यांचा फोकस हा विद्यार्थ्यांवर राहिला आहे. आजही त्यांच काम जोमाने सुरू आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार मिळत असल्याने आमची जबाबदारी आणखी वाढली असून पुरस्कार हे अधिक जोमाने काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असतात.आम्ही यापुढेही नक्कीच समाजासाठी कार्य करीत राहू असे जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संगितले.यावेळी संस्थेला सहकार्य करणाऱ्या देणगीदार व हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले.जॉय संस्थेला पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेक स्तरातून संस्थेचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी प्रदीप धामापूरकर यांचा जेष्ठ समाजसेवक श्री.विश्वनाथ पंडित यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण,अध्यक्ष अनंत कोळी,भूपेन कोळी,बाळ सोलकर,पत्रकार प्रशांत सिनकर,संस्थेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

